Natural Blood Purifiers | रक्त स्वच्छ करण्यासाठी औषध नाही अवलंबा हे 7 घरगुती उपाय, आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या होतात दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Natural Blood Purifiers | शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन (Oxygen) आणि पोषक द्रव्ये पोहोचवण्याव्यतिरिक्त, हार्मोन्सला पेशींपर्यंत नेण्याचे काम रक्त करते. शरीराचे कार्य व्यवस्थित चालवण्यासाठी रक्त शुद्ध आणि विषमुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पण काहीवेळा खाण्याच्या चुकीच्या सवयी शरीरातील टॉक्सिन्समुळे रक्त खराब होते. रक्तातील हे विष अनेक गंभीर आजारांना जन्म देऊ शकते. मुरुम आणि अ‍ॅलर्जीसारख्या (Acne, Allergy) त्वचेच्या समस्या देखील रक्तातील घाणामुळे उद्भवतात. अशावेळी, या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी, तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे रक्त स्वच्छ ठेवू शकता (Natural Blood Purifiers).

 

रक्त शुद्ध करण्यासाठी घरगुती उपाय

1. कडुलिंबाची पाने (Neem Leaves) –
सकाळी रिकाम्या पोटी 4-5 कडुलिंबाची पाने चघळल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी-इम्फ्लेमेटरी आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. रक्तात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.

 

2. तुळशीची पाने (Basil Leaves) –
तुळशीचे पाने अँटीबायोटिक गुणधर्मासाठी ओळखली जातात. रक्त शुद्ध करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त औषध म्हणून तज्ञ ओळखतात. रक्तातील विषारी घटक शरीरातून काढून टाकून रक्त स्वच्छ करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्यास फायदा होतो.

 

3. अ‍ॅपल व्हिनेगर (Apple Vinegar) –
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. रक्त स्वच्छ करण्यासाठी, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. पण जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करा. (Natural Blood Purifiers)

4. ब्राह्मी (Brahmi) –
ब्राह्मी हे आयुर्वेदात अतिशय फायदेशीर औषध म्हणून ओळखले जाते. रक्त शुद्ध करण्यासोबतच बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी हे औषध फायदेशीर ठरू शकते. ब्राह्मीचा रस मधात मिसळून प्यायल्याने फायदा होतो.

 

5. हळदीचे दूध (Turmeric Milk) –
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरातील साचलेली घाण निघून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

 

6. लिंबू (Lemon) –
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि सायट्रिक अ‍ॅसिड (Citric Acid) मुबलक प्रमाणात असते.
लिंबूपाणी हे सर्वोत्तम डिटॉक्स पेयांपैकी एक आहे. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात मध (Honey) मिसळून सेवन करू शकता.

 

7. पोषक तत्वांनी युक्त गोष्टी
जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे समृध्द अन्न खाल्ल्याने शरीरात विषारी द्रव्ये तयार होत नाहीत.
यासाठी तुम्ही ब्लूबेरी, ब्रोकोली, बीटरूट आणि गूळ (Blueberry, Broccoli, Beetroot, Jaggery) इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता,
कारण त्यात लोह, कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, फॉस्फरस आणि पोटॅशियम, (Iron, Calcium, Omega-3 Fatty Acids, Phosphorus, Potassium,)
व्हिटॅमिन सी यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Natural Blood Purifiers | natural blood purifiers home remedies to purify blood or tips to detoxify your blood naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Vs Shivsena | …म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली, भाजप नेत्याचा मोठा खुलासा

 

Devendra Fadnavis | भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘शरद पवारांचं दु:ख वेगळं’

 

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्