‘या’ 6 सोप्या उपायांनी बॉडी करा Detox, मिळतील अनेक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डिटॉक्सिफिकेशनचा अर्थ आपले शरीर आतून आणि बाहेरून रिलॅक्स, क्लिन करण्यासह त्यास पोषण देणे आहे. या प्रक्रियेत विषारी घटक बाहेर काढणे आणि आरोग्यदायी पोषकतत्वांचे सेवन करणे याचा समावेश होतो. यामुळे अनेक आजार दूर राहतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी एक खास डाएट घ्यावे लागते, ज्यामुळे विषारी घटक शरीराच्या बाहेर पडतात. या डाएटमध्ये लॅक्सेटिव्ह, ड्यूरेटिक, व्हिटॅमिन, मिनरल, हर्बल टी आणि अन्य फूड्सचा समावेश असतो. ज्यामध्ये डिटॉक्सिंग गुण असतात. जाणून घेवूयात डिटॉक्सच्या नैसर्गिक पद्धती…

हे आहेत उपाय

1 लिंबू रसासोबत गरम पाणी

एक ग्लास गरम पाण्यात थोडा लिंबू रस मिसळून हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. या कॉम्बिनेशनने शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होते. चांगल्या परिणामांसाठी यामध्ये खिसलेले आलेसुद्धा टाकू शकता.

2 मेडिटेशन करा

मेडिटेशन किंवा ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते, तणाव कमी होतो. शिवाय शरीर देखील डिटॉक्स करण्यास मदत होते. ध्यान करताना दिर्घ श्वास घेतल्याने सिस्टमला योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळतो, ज्यामुळे शरीराचे सर्व भाग व्यवस्थित काम करतात.

3 अल्कोहोलचे सेवन कमी करा

जेवढे अल्कोहोल आपण घेतो, त्याच्या 90% लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज होते. लिव्हरच्या एंजाइम अल्कोहोलला अ‍ॅसिटाल्डिहाइडमध्ये बदलतात, जे एक कँसर निर्माण करणारे केमिकल आहे.

4 कॅफीन नव्हे, ग्रीन टी

चहा किंवा कॉफीसारखे कॅफीन ड्रिंक्स, शरीराचे नुकसान करतात. यासाठी ग्रीन टी प्या, जो एक चांगला पर्याय आहे. ग्रीन टीमुळे पचनशक्ती वाढते, मेटाबॉलिज्म वाढते, वजन कमी होते.

5 एक्सरसाइज

वर्कआउट रूटीनमध्ये योग किंवा रश्शी उडी सारखी एक्सरसाइज करा, डिटॉक्सिफाइंग किंवा क्लींजिंगसाठी उपयुक्त असलेल्या एक्सरसाइज करा.

6 पूर्ण झोप

रोज पूर्ण आणि शांत झोप घ्या. शरीराचे आरोग्य आणि नॅचरल डिटॉक्स करण्यासाठी ती आवश्यक आहे.