Natural Gas Price | 1 ऑक्टोबरला ठरणार घरगुती गॅसच्या नवीन किंमती; दर 60 टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता : ONGC

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – अंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) नॅचरल गॅसच्या किंमतीत (Natural Gas Price) तेजीचा कल आहे. याचा परिणाम स्थानिक उत्खनन क्षेत्रातून उत्पादित गॅसवर (Gas) सुद्धा दिसणार आहे. सरकारकडून यावर्षी 1 ऑक्टोबरला घरगुती गॅसच्या (Domestic Gas) नवीन किंमती निर्धारित केल्या जातील.

तेल-गॅस उत्खनन क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) ने म्हटले की, यावेळी गॅसच्या किमतीत 60 टक्के वाढ जवळपास ठरली आहे. ओएनजीसीचे सीएमडी सुभाष कुमार यांनी कंपनीच्या वार्षिक आर्थिक अहवालाची माहिती देताना म्हटले की, जानेवारी-मार्च, 2021 मध्ये ओएनजीसीने 58.05 डॉलर प्रति बॅरलच्या दराने क्रूड ऑईल म्हणजे कच्च्या तेलाची विक्री केली आहे.

तर मागच्या आर्थिक वर्षात समान तिमाहीत विक्री दर 49.01 डॉलर प्रति बॅरल होती.
मागील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यात क्रूड आणि गॅसच्या किमती कमी झाल्याने महसुलावर परिणाम झाला होता.
परंतु आता किंमती सुद्धा वाढत आहेत आणि सरकारने ग्राहकांना दिली जाणारी सबसिडी सुद्धा बंद केली आहे.

या सबसिडीचा एक भाग सरकारी तेल कंपन्यांना उचलावा लागत होता.
मागील तिमाहीपर्यंत गॅसच्या किंमती खुप कमी होत्या.
सरकार प्रत्येक सहा महिन्यांनी घरगुती गॅसच्या किमती ठरवते.
जानेवारी-मार्चच्या तिमाहीत गॅसचा दर 1.79 डॉलर प्रति एमएमबीटीयू (प्रति दस लाख ब्रिटिश थर्मल युनिट) होता.

क्रूड महागणे आणि घरगुती ग्राहकांना दिली जाणारी पेट्रोलियम सबसिडी बंद केल्याच्या कारणामुळे मार्च, 2021 ला संपलेल्या तमाहीत ओएनजीसीला 6,734 कोटी रुपयांचा शुद्ध नफा झाला आहे.
कुमार यांनी म्हटले की, कंपनी या वर्षी 29,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

Web Title :-  Natural Gas Price new prices of domestic gas will be determined on october 1 prices likely to increase by 60 percent ongc

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती