खुशखबर ! 1 एप्रिलपासून ‘स्वयंपाक’ बनवणं आणि ‘वाहन’ चालवणं होणार स्वस्त, नॅचरल गॅसच्या दरात होणार मोठी ‘कपात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक पातळीवरील किंमती कमी झाल्याने एप्रिलपासून देशात नैसर्गिक वायूच्या किंमतीत जवळपास २५ टक्क्यांनी कपात होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी (ONGC) आणि ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Ltd) १ एप्रिलपासून सहा महिन्यांच्या कालावधीत गॅसच्या किंमती कमी करून जवळपास २.५ डॉलर प्रति १० लाख ब्रिटीश थर्मल युनिट्स करू शकतात. सध्या ते ३.२३ डॉलर प्रति युनिट आहे. या दोन कंपन्यांचा देशातील उत्पादित नैसर्गिक वायूमध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कठीण क्षेत्रातून तयार होणार्‍या नैसर्गिक वायूची किंमत सध्याच्या ८.४३ डॉलर प्रति युनिटवरून ५.५० डॉलर पर्यंत कमी करता येऊ शकते.

दर ६ महिन्याला निश्चित केली जाते नैसर्गिक वायूची किंमत
नैसर्गिक वायूच्या किमती ह्या दर सहा महिन्याला (१ एप्रिल आणि १ ऑक्टोबर) निश्चित केल्या जात असतात. नैसर्गिक वायूचा उपयोग खत आणि वीज निर्मितीमध्ये केला जातो. वाहनांमध्ये इंधन म्हणून सीएनजी (CNG) आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी (Cooking Gas) गॅस म्हणून देखील याचा वापर केला जातो. या गॅसच्या दराने जेथे युरिया, वीज आणि सीएनजीचे दर निश्चित केले जातात, तेथेच तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) सारख्या गॅस उत्पादकांचे उत्पन्न देखील निश्चित केले जाते.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निश्चित करण्यात आल्या किंमती
यापूर्वी नैसर्गिक वायूच्या किमतीत १ ऑक्टोबरला १२.५ टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. या अंतर्गत, दर ३.६९ डॉलर प्रति युनिटने कमी करून ३.२३ डॉलर प्रति युनिट करण्यात आले. त्याच वेळी कठीण क्षेत्रातून तयार होणार्‍या गॅसची किंमत सर्वोच्च स्तरावरुन ९.३२ डॉलर प्रति युनिटने कमी करून ८.४३ डॉलर प्रति युनिट केली गेली.

ओएनजीसीला बसणार धक्का
सूत्रांनी सांगितले की, किमती कमी झाल्याने देशातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी ओएनजीसीच्या उत्पन्नावर परिणाम होईल. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याची भागीदार बीपीच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो, दुसर्‍या टप्प्यात पूर्व ऑफशोअर भागात केजी-डी६ ब्लॉकमध्ये सापडलेल्या क्षेत्रातून सन २०२० च्या मध्यापासून उत्पादन करण्याची योजना आहे.

गॅसच्या किंमती कमी केल्याने ओएनजीसीसारख्या कंपन्यांचे उत्पन्न कमी होईल परंतु नैसर्गिक वायूमध्ये कच्चा माल म्हणून वापरल्या जाणार्‍या सीएनजीच्या किंमतीही कमी होतील. तसेच घरांमध्ये पाईपद्वारे पोहोचलेल्या एलपीजी आणि खते व पेट्रोकेमिकल्सची किंमतही कमी होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, ओएनजीसीचा महसूल आणि गॅस व्यवसायापासून मिळणारी मिळकत सुमारे ३,००० कोटींनी कमी होईल.

किंमत कपातीमुळे सरकारी अनुदान होईल कमी
प्रति युनिट गॅसची किंमत एक डॉलरने बदलल्यामुळे युरियाच्या उत्पादनाची किंमत प्रति टन १,६०० ते १,८०० रुपयांपर्यंत बदलते. किंमत कपातीमुळे सरकारी अनुदान २०२०-२१ च्या पहिल्या सहामाहीत ८०० कोटी रुपयांनी कमी होईल.