सतत शिंका येणं किंवा सर्दी होत असेल तर ‘कोरोना’ची भीती बाळगण्यापेक्षा ‘हे’ 5 उपाय करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  शिंक येण्याची अनेक कारणं असू शकतात. परंतु कोरोनामुळं लोकांमध्ये शिंकण्याला घेऊन भीती पसरली आहे. परंतु घाबरण्याचं काहीही कारण नाही. धुळीची अॅलर्जी, वातावरणातील बदल अशीही काही कारणं आहेत ज्यामुळं शिंक येते. काही लोकांना सतत सर्दी किंवा शिंक येण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत.

1) आवळ्याचा रस – तुम्हाला शिंका येण्याची समस्या असेल तर 15 दिवस आवळ्याचा रस नियमित प्या. यामुळं ही समस्या दूर होते.

2) लिंबू आणि मध – लिंबू आणि मधाच्या सेवनानं सर्दी-खोकल्याला आराम तर मिळतोच, शिवाय यानं तुम्हाला दुहेरी फायदा मिळतो. सकाळी उठल्याबरोबर पाण्यासोबत याचं सेवन केलं तर लठ्ठपणा कमी होतो. शरीरातील चरबी कमी होते. सर्दी खोकल्याचा त्रासही कमी होतो. एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून पिल्यानंतर खूप फायदा होतो.

3) चहा – आल्याचा चहा सर्दी खोकल्यासाठी चांगला असतो. यानं घसा शेकून निघतो. यामुळं सर्दी खोकल्यात काही प्रमाणात नक्कीच आराम मिळतो.

4) लसूण – प्रत्येकाच्या घरता लसूण असतो. यात एलिसिन नावाचं रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँट फंगल असतं. सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर लसणानं हा त्रास लवकर बरा होतो.

5) तुळस आणि आलं – याच्या सेवनानं सर्दी खोकल्याला लगेच आराम मिळतो. त्यामुळं हा उत्तम उपाय मानला जातो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पानं आणि आल्याचा एक तुकडा टाकून हे पाणी काही वेळ उकळू घ्या. हे पाणी अर्ध झाल्यानंतर या पाण्याचं म्हणजेच काढ्याचं सेवन करा. तुम्ही लहान असो वा मोठे सर्वांसाठी हा काढा उपयोगी ठरतो.