‘निसर्ग कट्टा’च्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाची चळवळ

अकाेला : पोलीसनामा ऑनलाईन

अकोला जिल्ह्यामध्ये पर्यावरण पुरक कार्यक्रम राबविण्यासाठी अमोल सावंत यांचा ‘निसर्ग कट्टा’च्या माध्यमातून विविध शाळांमध्ये विध्यार्थ्यांची निसर्ग संवर्धनासाठी चळवळ सुरू केलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचे वेध लागले असतांना मागील एक महिन्यापासून निसर्ग कट्टाची टीम अकोला जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयमध्ये पर्यावरण पुरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळांचे आयोजन करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजावून त्यांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पेक्षा शाडू मातीच्या गणेश मूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa46fb4b-b4eb-11e8-9469-2fe4580279ea’]

निसर्ग कट्टा टीमने जिल्ह्यातील RLT महाविद्यालय, ज्ञानदीप कॉन्व्हेंट, राजेश्वर कॉन्व्हेंट, बालशिवाजी माध्यमिक शाळा, JRD Tata EDULAB, तसेच सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग व वन्यजीव विभागातील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासोबतच वाशीम जिल्ह्यातील श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे देखील पर्यावरण रक्षणासाठी मातीपासून मूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. स्व. पांडुरंग सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काटेपुर्णा येथे जाऊन मूर्ति निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले. निसर्ग कट्टाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी स्वतः च्या कल्पकतेने सुंदर आणि सुबक गणेशमूर्ती बनविल्या असून याच मूर्तिंची स्थापना करून घरीच विसर्जन करण्याचा संकल्प घेतला. मातीची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते त्यामुळे पर्यावरणचा ऱ्हास होत नाही तसेच यामुळे नद्या व निसर्गातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.

अकोला मधील ज्यांना मातीच्या मूर्ती ची स्थापना करायची आहे त्यांच्या साठी खास दरवर्षी खंडेलवाल मारुती शो रूम जवळ मातीच्या गणपती विक्रीचा स्टॉल लावण्यात येत असतो, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा प्रशिक्षणासाठी अमोल सावंत यांच्या सोबतच संदीप वाघडकर, शिवा इंगळे, प्रेम अवचार, मनोज रुद्रकार, सुरज घोगरे, अजय शेंगोकर, शुभम कचरे, कार्तिक काळे, आनंद पाचरे यांनी परिश्रम घेतले.

Please Subscribe Us On You Tube