नारीवली ग्रामपंचायतिला पोलीस छावणीचे स्वरूप

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन ( अरुण ठाकरे) –    तालुक्यात 15 जानेवारी रोजी झालेल्या सार्वञिक निवडणुकीचा निकाल आज दिनांक १८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून या ग्रामपंचायत निवडणुकीत मध्ये नारीवली येथील काही जिल्ह्या परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकानीं शासनाचे आदेश धाब्यावर बसवून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून आले मात्र या संपूर्ण प्रकरणाची पोलीस,तहसीलदार, निवडणूक अधिकारी यांना पुलीग बूथ वर हजर असल्याचे पुरावे देऊनही कोणतीही कारवाही किंवा कायदेशीर गुन्हे झाल्याचे दिसून आले नाहीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक निवडणूक फॉर्म भरण्या पासून ते माघारी घेण्या पर्यंत तहसील कार्यालयाच्या कॅमेऱ्या मध्ये कैद झाले असून या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जंगम याना पत्रही दिले अस्तना कोणतीही कारवाही झाल्याचे दिसून आले नाही मात्र या शिक्षकांन वर कोणती कारवाही होते यावर लक्ष लागले आहे.

निकालावर महाविकास आघाडीने 38 जागावर दावा केला आहे तर भाजपा ने 37 ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याचे सांगीतले. तालुक्यात 126 पैकी 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातील पाच ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या होत्या. दोन्ही बाजूकडून सारखाच दावा केल्याने खरे वास्तव सरपंच निवडणुकी नंतर स्पष्ट होणार आहे.

वडणुक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वञिक निवडणुकीचा कार्यक्ररम जाहीर करुन 15 जानेवारीला मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होईल असे जाहीर केले होते. त्यानुसार तालुक्यात 44 पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणुक म्हटले की भावबंदकीत वाद विवाद होतात . त्यासाठी भाजपाचे आमदार किसन कथोरे , तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव तर शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार , विधानसभा संघटक मधुकर घुडे , तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,माजी पंचायत समिती सदस्य परशराम भोईर, शेखर भोईर. या नेत्यांनी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. माञ काही हट्टी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकानीं ढवळाढवळ केल्याने आदेश न मानता निवडणुका लढवल्या. खरे तर निवडणुक पूर्व बिनविरोध करण्याचे नाटक करायचे आणि निवडुण आल्या नंतर आपल्याच पक्षाचा असा दावा करायचा. तसे या निवडणुकीत देखील बघण्यास मिळाले आहे.
भाजपाचे तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव यांनी 37 ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा केला असतांना , शिवसने कडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी महाविकास आघाडीने 31 ग्रामपंचायतीवर बहुमत मिळाल्याचे सांगीतले. माञ सरंपच निवडणुकी नंतर कोणा कडे किती ग्रामपंचायत हे स्पष्ट होणार आहे.

मतदान दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक पुलिंग बूथ वर हजर असल्याचे व्हिडिओ तहसीलदार, पोलीस स्टेशन,निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले असून आत्ता कोणती कारवाही होते यावर लक्ष लागले आहे. सी आर पी सी १४९ प्रमाणे नोटीस दिल्या असतानाही विजयी उमेदवारांनी फटाके फोडून आदर्श आरसाहितेचा भंग केल्याचा संदर्भित व्हिडीओ मुरबाड तहसीलदार,पोलिस स्टेशन,निवडणूक निर्णय अधिकारी यान सुपूर्द केला अडून कोणती कारवाही होते यावर लक्ष लागले आहे