नौदलात नोकरीची संधी ! ‘या’ विभागात 1233 जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकरी शोधणाऱ्यासाठी ही बातमी महत्वाची आहे कारण भारतील नौदलाने नोटिफिकेशन जारी केले आहे. ज्यात अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागण्यात आले आहेत. यात एकूण 1233 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या पदांसाठी ते उमेदवार अर्ज करु शकतात, ज्याच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र आहे. यात 300 पद नॉन डेजीग्नेटेड ट्रेड्स (OT – 03) साठी आहे आणि 933 पद डेजीग्नेटेड ट्रेड्स (IT – 23) साठी आहे.

रिक्त पदे –

पदांची संख्या – 1233

नॉन डेजीग्नेटेड ट्रेड्स – 300
डेजीग्नेटेड ट्रेड्स – 933
गॅस टर्बाइन फिटर – 26
मशिनरी कंट्रोल फिटर – 10
हॉट इंसूलेटर – 1
इलेक्ट्रिक फिटर – 45
गायरो फिटर – 09
सोनार फिटर – 10
वॅपन फिटर – 31
सिविल वर्क्स – 32
शिप फिटर – 14
ICE फिटर क्रेन – 44
रडार फिटर – 24
कंप्युटर फिटर – 11
बॉलर मेकर – 25
रेडिओ फिटर – 18

निवड प्रक्रिया –
या पदांच्या निवडीसाठी लेखी परिक्षा, मुलाखती आणि कौशल्य तपासणी द्वारे करण्यात येईल. लेखी परिक्षेनंतर उमेदवारांना मुलाखत आणि कौशल्य तपासणीसाठी बोलावण्यात येईल.

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर असणार आहे.

शैक्षणिक पात्रता –
1. 10 वीमध्ये 50 टक्के मार्क असणे आवश्यक असेल.

2. ज्या फ्लिडसाठी अर्ज करणार असाल त्यातील आयटीआय प्रमाणपत्र आणि 65 टक्के मार्क असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा –
उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 1999 पासून 31 मार्च 2006 दरम्यानचा असावा. आरक्षण असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट असेल.

असा करा अर्ज –
bhartiseva.com या वेबसाइटवर जाऊन उमेदवाराला अर्ज करावा लागेल. अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनुसार अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची आंतिम तारीख 21 सप्टेंबर असणार आहे.

 

You might also like