Pune – Navale Bridge Accident | नवले ब्रिजजवळील अपघात नक्की कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला?; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे- बंगलोर हायवेवर (Pune Bangalore Highway) नवले पुलावर (Pune – Navale Bridge Accident) काल रात्री एक मोठा अपघात झाला. या अपघातात (Pune – Navale Bridge Accident) एका टँकरने एकाच वेळी 24 वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय, 12-14 जण जखमी झाले आहेत. आता या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतली आहे. (CM Eknath Shinde On Pune – Navale Bridge Accident)

 

एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले, ‘पुण्यातील नवले ब्रिज येथे आज रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश दिले आहेत.’ पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणतात,’या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला दिल्या असून या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिली.’

 

पुण्यातील नवले पुलावर सातत्याने अपघात घडतात.
या पुलाचा उत्तर अत्यंत तीव्र असल्याने अनेक मोठ्या गाड्यांचे नियंत्रण सुटून अपघात झाले आहेत.
त्यामुळे अनेकांना अशा अपघातात त्यांचे जीव गमवावे लागले आहेत. प्रशासनाने यासंबंधी काहीतरी उपाय करण्याचे आवश्यकता जाणून येत आहे.

 

Web Title :- Pune – Navale Bridge Accident | chief minister eknath shinde has ordered an inquiry into the horrific accident that took place near navale bridge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘पत्रकार मुली साड्या का नाही नेसत?’ विधानावर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

Sanjay Raut | राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; शिवसेना खासदार म्हणाले – ‘हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय…’

Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | ‘दृश्यम 2’मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य; पोस्ट व्हायरल