नवरात्र उत्सवानिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन – अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. प्रथमत: सकाळी मुख्य मंदिरात पाखाळणी, धार्मिक विधी होऊन उत्सव मुर्तीना नवीन पोशाख परिधान केले जातात. त्यानंतर सनई चौघड्यांच्या मंगलमय वाद्यात उत्सवमुर्ती बालद्वारीत आणून विधीवत घटस्थापना केली जाते आणि खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाची सुरूवात होते.
Jejuri
नवरात्रीच्या काळामध्ये त्रिकाल सनई चौघडा वादन तसेच लोककलावंतांची हजेरी श्रींच्या समोर सादर केली जाते. गडकोट मंदिर आवाराला विद्युत रोषणाई केली जाते. नवरात्र व दसरा उत्सव हा जेजुरी नगरीतील अठरा पगड जाती धर्मातील समस्त ग्रामस्थ, खांदेकरी मानकरी यांच्या मानापानाचा उत्सव असल्याने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेला जेजुरीकर हमखास गावाची वाट धरतो. उत्सवात सहभागी होत मानपान देत घेत आपली सेवा खंडेराया चरणी अर्पण करतो. मुख्य विजयादशमीच्या दिवशी तर जेजुरीकरांच्या उत्साहाला उधाणच आलेले असते.

Visit : Policenama.com