आशापुरा माता मंदिरात नवरात्र महोत्सव !

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरासह राज्यातील लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगाधाम- शत्रुंजय मंदीर रस्त्यावरील आशापुरा माता मंदिरात नवरात्री निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन मां आशापुरा माता ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’12ae7903-ca3d-11e8-8cd7-c543167c9887′]

आशापुरा माता, महालक्ष्मी माता, अंबा माता, सच्चाई माता, पद्ममावती माता, गणेश मंदिर व सोनाना खेतलाजी मंदिर असलेले हे भव्य मंदिर सुमारे एक एकर जागेत आहे. २०१५ साली या मंदीराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते व २०१७ साली हे भव्य मंदिर नागरीकांसाठी खुले करण्यात आले. अतिशय आकर्षक कोरीव काम, प्रसन्न मुद्रा व प्रचंड तेजस्वी मूर्ती असल्यामुळे या भागातील नागरीकांचे हे मंदिर म्हणजे श्रद्धास्थान बनले आहे. वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.

या वर्षी नवरात्री निमित्त ट्रस्टच्या वतीने रोज सकाळी ६.३० ते १.३० पर्यंत अभिषेक, दुपारी ४.३० ते ६.३० नवचंडी महायज्ञ जो फक्त महाराष्ट्रात तुळजापुर नंतर या मंदिरात केला जातो. संध्याकाळी ७.३० ला महाआरती तसेच रात्री १०.३० ला शयन आरती होणार आहे. दररोज संध्याकाळी ७.३० वा. नामवंत संगितकाराची “माता की चौकी” या विशेष भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या नवरात्र महोत्सवात १२ तारखेला आधार मुक-बधीर विद्यालय बिबवेवाडी येथील विशेष मुलांच्या हस्ते महाआरती होणार आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19c4bea4-ca3d-11e8-9914-6f9d814cf443′]

१३ तारखेला १ हजार ८ मुलांचे ” श्री सुप्त पठन” होणार आहे.१५ तारखेला समाजातील ९ विशेष पदावर काम करणाऱ्या महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. १६ तारखेला पालिकेच्या सफाई कामगारांचा सन्मान होणार आहे. १७ तारखेला “कन्या पुजन” होणार आहे.

अशी माहिती मंदिराचे प्रमुख विजय भंडारी यांनी दिली. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विमल भंडारी,विजय भंडारी,अनिल गेलडा,चेतन भंडारी,अशोक भंडारी,गौतम गेलडा, शशीकांत भंडारी,मंगेश कटारीया,शाम खंडेलवाल,प्रवीण मेहता,बाळासाहेब बोरा,पंकज कर्नावट,हितेश लोढा यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.