राज्यात लॉकडाऊन लागणार का ? अजित पवारांचं महत्त्वाचं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाव्हाशेवा पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर भाष्य केलं आहे. 1 तारेखपासून कोरोना वाढल्याचं त्यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, शहरात लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. यवतमाळ, अमरावती प्रमाणे अनेक ठिकाणी कडक नियम करावे लागले. आजपासून पुण्यात नाईट कर्फ्यु आहे. त्यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बोलणार आहे असंही ते यावेळी म्हणाले.

पुढं बोलताना अजित पवार म्हणाले, आपल्याला पुढं काय निर्णय घेण्याची गरज आहे हे सांगितलं असलं तरी देखील लोकांना गांभीर्य नाही. त्यामुळं फार कठोर निर्णय घेण्याची वेळ कृपा करून राज्यावर येऊ देऊ नका असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

पाणी पुरवठा योजनेच्या भूमीपूजनावर बोलताना ते म्हणाले, याच वर्षात काम पूर्ण झालं पाहिजे. कुठलीही अडचण येता कामा नये. त्यांनी अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम केलं पाहिजे. प्रकल्पाचं काम उत्कृष्ट राहिल. यात कामात त्रुटी राहता कामा नये अशी अपेक्षा मी संबंधित अधिकाऱ्याकडून व्यक्त करतो असंही त्यांनी सांगितलं.