कधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम इंडिया’मध्ये सामिल, १४० च्या स्पीडने ‘बॉलिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये दिल्लीच्या एका वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. हा खेळाडू प्रतितास १४० च्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्यानंतर आता हा विंडीजमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी तयार झाला आहे.

नवदीप सैनी या दिल्लीच्या खेळाडूला मर्यादित षटकांच्या सामन्यांत संधी देण्यात आली असून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी हा खेळतो. नवदीप सैनी हा हरियाणाचा रहिवासी असून दिल्लीसाठी रणजी सामन्यांत खेळतो. सलग १४० च्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. २६ वर्षीय गोलंदाजाने २०१३-१४ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी रणजी सामन्यांनातून दिल्लीसाठी पदार्पण केले होते. वेगवान गोलंदाजीने त्याने निवास समितीचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. टेनिस क्रिकेटपासून भारतीय संघापर्यंतचा त्याचा प्रवास फार कठीण होता. प्रत्येक सामन्यासाठी त्याला त्यावेळी २५० ते ३०० रुपये मिळत असतं. नवदीपचे कुटुंबीय त्याच्या कोचिंगचे पैसे भरण्यास सक्षम नसल्याने तो टेनिस क्रिकेटस्पर्धांत सहभागी होत असे. त्याचदरम्यान दिल्लीतील सुमित नरवाल यांनी त्याची प्रतिभा ओळखून त्याला दिल्लीला आणले.

डोळ्यात तरळले अश्रू

नवदीपचे वडील अमरजीत सैनी यांनी सांगितले कि, त्याने आमचे स्वप्न पूर्ण केले असून आम्ही ज्या गोष्टी पाहू आणि करू नाही शकलो त्याच्यामुळे हे सर्व मिळत आहे. ज्यावेळी मोहालीत मी त्याला समोर खेळताना त्यावेळी माझा आनंद गगनात मावत नव्हता.

आरोग्यविषयक वृत्त –