Navi Mumbai ACB Trap | अलिबागच्या लाचखोर महिला तहसीलदार मिनल दळवींकडे सापडले कोट्यवधींचं घबाड

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अलिबाग तालुक्यातील एका जमीनीच्या अपीलावर सुनावणी सुरु असताना त्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी दोन लाख रुपये लाच (Accepting Bribe) घेताना अलिबागच्या तहसीलदार (Alibaug Tehsildar) मीना कृष्णा दळवी Meena Krishna Dalvi (वय 49) यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Navi Mumbai ACB Trap) सापळा रचून ताब्यात घेतले. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने (Navi Mumbai ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास केली. यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता कोट्यावधी रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे.

 

अलिबागच्या लाचखोर तहसीलदार मीनल दळवी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या संपत्तीची मोजदाद सुरु केली असता, त्यांच्याकडे तब्बल 60 तोळे सोने (Gold) आढळून आले. तसेच अलिबाग येथे गाडी आणि घरात 75 हजार तर मुंबईतील विक्रोळी येथील घरातून 1 कोटीहून अधिक रोख रक्कम (Cash) सापडल्याची माहिती नवी मुंबई एसीबी पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख (DySP Jyoti Deshmukh) यांनी दिली.

 

काय आहे प्रकरण?

नवी मुंबई एसीबीच्या पथकाने (Navi Mumbai ACB Trap) तहसीलदार मीनल कृष्णा दळवी आणि एजंट राकेश रमाकांत चव्हाण Agent Rakesh Ramakant Chavan (वय-49) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. मीनल दळवी यांनी तीन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती दोन लाख रुपये स्विकारण्याचे कबुल करुन लाचेची रक्कम एजंट राकेश चव्हाण याच्याकडे देण्यास सांगितले होते. याबाबत 27 वर्षाच्या व्यक्तीने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 28 सप्टेंबर 2022 रोजी तक्रार केली होती.

 

तक्रारदार यांचे सासरे यांच्या नावावर जमिनीचा सातबारा नोंद होण्यासाठी आदेश देण्यासाठी व अपील प्रकरणाचा (Appeal Case) निकाल तक्रारदार यांचे सासरे यांचे बाजूने देण्यासाठी आरोपी राकेश चव्हाण याने स्वतःसाठी व तहसीलदार मीनल दळवी यांच्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी तक्रार केल्यांतर नवी मुंबई एसीबीच्या पथकाने 29 सप्टेंबर 2022 रोजी पडताळणी केली असता मीनल दळवी यांनी 3 लाखाची लाच मागून तडजोडी अंती 2 लाख घेण्याचे मान्य केले.

 

शुक्रवारी सायंकाळी अलिबाग नगरपालिका इमारतीच्या समोर असलेल्या आर के इलेक्ट्रॉनिक शॉप सापळा रचण्यात आला.
एजंट राकेश चव्हाण याला तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर तहसीलदार मीनल दळवी यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar),
नवी मुंबई एसीबी पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख (DySP Jyoti Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे (Police Inspector Shivraj Bendre),
पोलीस हवालदार जाधव, पवार, चालक गायकवाड, पोलीस नाईक ताम्हाणेकर,
नाईक, आयरे, महिला पोलीस नाईक सावंत, विश्वासराव, चव्हाण, माने यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Navi Mumbai ACB Trap | bribery tehsildar dalvi 60 tolas of gold and thousands in cash

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘ज्यांनी खोके घेतले आहेत, त्यांनी उघडपणे सांगावे…,
मला पण उद्धव ठाकरेंनी एक खोका दिला, पण त्यात…’ – अमोल मिटकरी

NCP MLA Jitendra Awhad | ‘लोकांना जमिनीवर आणायचं असेल, तर…’; जामीन मिळताच जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर हल्लाबोल

Mumbai Police DCP Transfer | मुंबई पोलीस आयुक्तालयातील 15 उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या, तर बाहेरुन बदलून आलेल्या 13 उपायुक्तांच्या नियुक्त्या