नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज विशाल मोर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navi Mumbai | येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला (navi mumbai international airport) दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज स्थानिकांचा मोर्चा (Morcha) काढण्यात येत आहे. या मोर्चाला पोलिसांनी पामबीच मार्गावर पालिका मुख्यालयासमोरील जागा दिली आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर नेरुळ ते बेलापूर दरम्यान आंदोलक जमणार आहेत. यामुळे पामबीच मार्गावरील वाहतूकी (Transport) त बदल करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

या आंदोलनामुळे पुणे, कोकण, मुंबईत येणार्‍या जाणार्‍या वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. या आंदोलनात नवी मुंबईसह पनवेल, उरण, कल्याण, डोंबिवली, पालघर इत्यादी परिसरातून ५० हजारांहून अधिक आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच कल्याण, डोंबिवली परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

कोण होते दि. बा. पाटील (D. B. Patil)

दिनकर बाळू ऊर्फ दि. बा. पाटील (D. B. Patil) हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, पनवेल -उरण विधानसभा मतदारसंघाचे ५ वेळा आमदार आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. १९५७ साली ते सर्वप्रथम आमदार झाले. त्यानंतर ते १९८० पर्यंत पाच वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते. शेतकरी कामगार पक्षाचे ते नेते होते. सिडको ही सरकारी संस्था नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटील यांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी -कष्टकर्‍यांसाठी सारे आयुष्य वेचले. प्रकल्पग्रस्ताच्या आंदोलनात पोलिसांचा लाठीमार सहन केला.

तसेच कारावासही पत्करला. नवी मुंबईतील आगरी समाजासह त्यांच्या जमिनींना पाटील यांनी चांगला भाव मिळवून दिला. त्यांच्या एका हाकेसरशी लाखो लोक आंदोलनासाठी जमत असत. पाटील यांच्या नेतृत्वामुळे रायगड जिल्ह्यात कायमच शेकापचे वर्चस्व रहात आले आहे. २५ जून २०१३ रोजी त्यांचे निधन झाले. तरीही त्यांच्या नावाचा महिमा रायगड जिल्ह्यात अजूनही कायम आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Navi Mumbai Airport Morcha today to demand naming of d ba Patil

हे देखील वाचा

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक