Navi Mumbai : भाजपा आमदार गणेश नाईकांच्या नातवाला मारहाण, FIR दाखल

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईचे भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला क्षुल्लक कारणावरुन मारहाण झाली आहे. मुरबाड येथील टोकावडेजवळ बुधवारी (दि. २४) ही घटना घडली आहे. या प्रकरणी टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नाईक यांचे नातू आणि माजी खासदार संजीव नाईक यांचे पुत्र संकल्प नाईक आणि त्याचा मित्र तजेंद्रसिंग हरजितसिंग मंत्री यांना मारहाण झाली आहे संकल्प नाईक मित्र तजेंद्रसिंग हे बुधवारी तळवलीगाव येथे गेले होते.

त्यावेळी त्यांनी आपली चारचाकी गाडी अचानक वळवली. दरम्यान मागून येणारी दुचाकी कारला धडकली. त्यावेळी खाली पडलेल्या दुचाकीस्वार प्रवीण लिहे याला विचारपूस करण्यासाठी गेलेल्या संकल्प आणि तजेंद्रसिंग यांना नीलेश देसले आणि त्यांच्या तीन साथीदारांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.