Navi Mumbai Crime | …म्हणून लहान मुलांचे क्लासेस घेणाऱ्या सख्या बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या, नवी मुंबईतील घटना

नवी मुंबई : वृत्त संस्था – नवी मुंबईतील (Navi Mumbai Crime) ऐरोली सेक्टर १० येथील सागर दर्शन सोसायटीमध्ये राहणार्‍या दोघा सख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या (Navi Mumbai Crime) केल्याचे उघडकीस आले आहे.

लक्ष्मी पंत्री (वय ३३) आणि स्रेहा पंत्री (वय २६) अशी या सख्या बहिणींची नावे आहेत. आर्थिक चणचणीतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेले प्राथमिक तपासात पुढे येत आहे. या दोन्ही बहिणी सुशिक्षित असून त्या लहान मुलांचे क्लासेस घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होत्या. मात्र, गेल्या वर्षभरापासून क्लासेस बंद असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी आल्या होत्या.

दोन्ही बहिणींच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून १० वर्षापूर्वी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती. सोसायटीतील इतरांशी यांचा फारसा संपर्क नसायचा.
गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. दोघी बाहेर कोणाला दिसल्या नाही.
त्यात घरातून दुर्गंधी सुटल्याने शेजारी राहणार्‍या लोकांनी दरवाजा वाजविला,
परंतु, आतून प्रतिसाद न दिल्याने त्यांनी माजी नगरसेवक विजय चौगुले,
मामित चौगुले यांना याची माहिती दिली. त्यानंतर चौगुले हे तेथे आले.

त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा  तोडल्यावर आतमध्ये एका बहिणीने हॉलमध्ये तर दुसरीने बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Sisters Suicide) केल्याचे आढळून आले. आर्थिक अडचणीतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.

Web Title : Navi Mumbai Crime | sisters committed suicide by hanging in navi mumbai

Anti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि
संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Mumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार,
नवी नियमावली जाहीर

Pimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक
पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार