Navi Mumbai Crime | विवाहितेची मुलासह सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- Navi Mumbai Crime | सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या पाचवर्षीय मुलासह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide In Navi Mumbai) केल्याची घटना नवी मुंबईतील (Navi Mumbai Crime) कोपरखैरणे येथे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आरती विजेंद्र मल्होत्रा असे आहे, तर या घटनेत तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आरतीने याआधी मागच्या वर्षीदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला तिच्या घरातल्यांनी वाचवले होते.
आरतीचा २०१६ मध्ये विजेंद्र मल्होत्राशी विवाह झाला होता. त्यांची ओळख ऑनलाइन मॅट्रिमोनी साइटवर झाली आणि ते विवाहबद्ध झाले. लग्नानंतर आरती विजेंद्रसह, सासू-सासरे आणि नणंद यांच्याबरोबर कोपरखैरणे सेक्टर-20 येथील श्री रावेची अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर राहत होती. 2017 मध्ये आरती आणि विजेंद्र यांना मुलगा झाला. विजेंद्र मल्होत्रा हा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काम करतो. आत्महत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरतीच्या पतीला अटक केली आहे. तसेच आरतीच्या सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात आरतीच्या भावाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. “लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे चांगली होती. पण त्यानंतर छोट्या गोष्टींवरून सासरकडून आरतीचा शारीरिक आणि मानसिक छळ होऊ लागला.
शिवाय ते आम्हाला तिला भेटू देत नव्हते किंवा तिला आमच्यासोबत फोनवर बोलू देत नव्हते.
यंदाच्या दिवाळीला जेव्हा आम्ही तिला आणि भाच्याला भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मिठाई आणि भेटवस्तू
स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय माझ्या बहिणीला आम्हाला भेटूही दिले नाही. सोमवारी (5 डिसेंबर) सासू आणि नणंदने आरतीला तिच्या मुलापासून दूर ठेऊन घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे आरतीने असं टोकाचे पाऊल उचललं,” असे त्याने दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. (Navi Mumbai Crime)

या तक्रारीनंतर पोलिसांनी आरतीच्या पतीसह, सासू किरण मल्होत्रा आणि नणंद अंजली मल्होत्रा यांच्याविरोधात
भादंवि कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 498 A (पती आणि कुटुंबीयांकडून महिलेचा छळ) आणि
34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

Web Title :-Navi Mumbai Crime | woman dies after jumping off building with 5 year old son in koparkhairane police station crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | मुख्यमंत्री शिंदे यांनी उरुळी देवाची-फुरसुंगीचे केले राजकीय ‘ऑपरेशन’ ! सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना आयुष्यभर सोसाव्या लागणार वेदना?

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया