नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला ‘खिंडार’ पडणार !

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तुर्भे मधील चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत . शिवसेनेसोबतची जवळीक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांची आजच्या कार्यक्रमातून पाहायला मिळाली. त्याचा हा त्यांनी घोषित न केलेला प्रवेश मानला जात आहे.

सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच एकनाथ शिंदे यांनी सांगितले तुर्भेमधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील. एकनाथ शिंदे हे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. यातच नगरसेवक फुटीची बातमी समोर आल्याने गणेश नाईक यांच्या अडचणी वाढू शकतात.

नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा काही दिवसांपूर्वीच मेळावा झाला होता. या मेळाव्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं.

अजित पवार कार्यकर्ता मेळाव्यात झाले होते आक्रमक
नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर आता वातावरण तापू लागलं आहे. हि निवडणूक काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढविणार आहेत. वाशी येथे महाआघडीचा मेळावा याच निवडणुकीची तयारी म्हणून झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांच्यावर टीका केल्या.

अजित पवार यांनी निवडणुकीच्या मैदानात दंड म्हणाले, आगामी निवडणुकीनंतर नवी मुंबईत कुणी महापौर होईल, कुणी स्थायी समिती अध्यक्ष होतील, कुणी सभापती होतील, पण नाईक कुटुंबातील कुणी काहीही होणार नाही, ‘नवी मुंबईतील महाआघाडीच्या मेळाव्याला एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण आणि अजित पवार हे नेते हजर होते.

नवी मुंबईतील एकाधिकार शाही खपवून घ्यायची नाही,’ ‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. असं म्हणत अजित पवार यांनी नाईक कुटुंबाच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. ज्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकपद मिळणार नाही, त्यांना जिल्हा समित्यांवर आणि महामंडळ समितीवर घेणार असं बोलत, अजित पवार यांनी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी सावध पवित्रा घेतला.