नवी मुंबईत मनसेला धक्का ! शहराध्यक्षांनी दिला राजीनामा

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यायला काळे यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचा आरोप त्यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मनसेची स्थिती सध्या म्हणावी तेवढी चांगली नाही त्यात आता पक्षांतर्गत वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गजानन काळे म्हणतात, सलग दोन तीन निवडणूका न लढता देखील नवी मुंबईमध्ये ५० हजार हुन अधिक लोकांनी पक्षावर विश्वास दाखवला गेल्या ५ वर्षात पक्षान मजबूत बांधणी करण्याचा प्रयत्न केला मात्र अमित ठाकरेंच्या मोर्चाला यश येऊ नहे म्हणून अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून पक्षात गटातटाच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे चित्र पहायला मिळाले झालेल्या सर्व प्रकारासाठी अविनाश जाधव यांनी मला दोषी ठरवले त्यामुळे मला त्यांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा नसल्याचे सांगत काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आपल्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे त्यामुळे मी केवळ महाराष्ट्र सैनिक म्हणून सदैव पक्षासाठी काम करणार असल्याचे सांगत इतर दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे गजानन काळे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील महत्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. काही वर्षातच महानगर पालिकेच्या निवडणूका आहेत अशात नवी मुंबईमध्ये मनसे विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मनसेत जागा रिकाम्या झाल्या आणि गटातटाचे राजकारण सुरु झाल्याचे पहायला मिळाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Loading...
You might also like