नवी मुंबईतील इंटरनेट सेवा अद्याप बंदच

नवी मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन 

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर होऊ लागल्याने काल बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा गुरुवारी सकाळीही सुरु झाली नव्हती. बुधवारी कोपर खैरणेत दोन गटात वाद झाला. यामुळे रात्री उशिरापर्यंत परिसरात तणाव होता. त्यानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर होऊ लागल्या होत्या. यामुळे संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी मध्यरात्रीपासून शहरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B079T5L898′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e8ac2fe5-9097-11e8-b1ec-65f5152955c4′]

आता मुंबई आणि ठाणे येथील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. कळंबोली येथे हिंसक जमावाने पोलिसांची वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांना अश्रुधाराचा वापर करावा लागला. या भागातील परिस्थिती आज नियंत्रणात असली तरी काही कंपन्यांनी खारघर परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. तसे मेसेज कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत. सरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. सरकारकडून पुन्हा सूचना मिळाल्यानंतर तुमची इंटरनेट सेवा पूर्ववत होईल असे मोबाईल, इंटरनेट कंपन्यांकडून मेसेज पाठविण्यात आले आहे.