नवी मुंबईमधील DY पाटील कॉलेजच्या नव्या इमारतीला भीषण आग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवी मुंबईमधील डी वाय पाटील कॉलेजमधील नव्या इमारतीच्या बांधकामाल आग लागल्याची घटना समोर आली आहे. इथं थर्माकॉल मोठ्या प्रमाणात असल्यानं आग भडकल्याची माहिती आहे.

डी वाय पाटील प्रशासनानं एक नवीन बिल्डींग बांधायला घेतली होती. या नव्या इमारतीच्या बांधकामाला आग लागली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी आणलेल्या मटेरियलला आग लागल्याची माहिती आहे. या आगीची तीव्रता जास्त आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्यामुळं ही आग लागल्याचं समजत आहे. या ठिकाणी धुराचे लोटच्या लोट दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, याच बिल्डींगच्या काही अंतरावर मुलींचं वसतिगृह आहे. याशिवाय डी वाय पाटील स्टेडियम आणि डी वाय पाटील हॉस्पिटल देखील या इमारतीपासून काही अंतरावर आहे. या बाजूला आग पसरू नये यासाठीही फायर ब्रिगेड प्रयत्नशिल आहे. या ठिकाणी थर्माकॉल जास्त प्रमाणात असल्यानं आग जास्त भडकत आहे.