‘नवी मुंबई-मांडवा-गेट वे’ जलवाहतूक सुरु होणार, 2 तासांचे अंतर अर्ध्या तासावर

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईकरांचे (navi mumbai) समुद्रमार्गाने जलवाहतुकीने (waterway) किंवा मुंबईत किंवा अलिबागला प्रवास करण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. येत्या सहा महिन्यात मुंबईकरांना जलप्रवास करता येणार आहे. नेरुळ खाडीतील जेट्टीचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या मार्च महिन्यापासून नेरुळ-गेटवे ऑफ इंडिया-मांडवा (mandwa-gate way of india) अशी जलवाहतूक सुरु होणार आहे. ही जलवाहतूक सुरु होणार असल्याने दोन तासांचे अंतर अवघ्या अर्ध्या तासांवर येणार आहे.

नेरुळ (nerul) खाडीमध्ये उभे राहत असलेल्या जेट्टीचे काम 2018 मध्ये सुरु करण्यात आले होते. मुंबई आणि मांडवाला जोडणाऱ्या जलमार्गाचा नवी मुंबईतील थांबा नेरुळ खाडीमध्ये उभा राहत आहे. 111 कोटी रुपये खर्च करुन उभा राहत असलेल्या नेरुळ जेट्टीचे काम पर्यावरण परवानग्यांमुळे आणि कोरोनामुळे (corona) रखडले होते. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी खासदार राजन विचारे (rajan vichare) आणि सिडको एम डी संजय मुखर्जी आले होते. त्यांनी भेट देत या प्रकल्पाचा आढावा घेतला.

नवी मुंबईतून मुंबई, आलिबागला जाण्यासाठी लोकल किंवा रस्तेमार्गाने जाण्यासाठी सध्या दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र यामार्गाने जलवाहतूक सुरु झाल्यानंतर नागरिकांसाठी हा प्रवास सोपा होणार आहे. तसेच त्यांचा वेळ देखील वाचणार आहे. ही जलवाहतूक येत्या मार्चमध्ये सुरु होणार आहे. मार्च मध्ये जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहतूक सुरु होणार असल्याने नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

वनविभागाच्या परवानगीसाठी 18 महिन्याचा कालावधी लागला असला तरी आता सर्व परवानग्या पूर्ण झाल्या असल्याचे सिडको एम डी संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे. मार्चपर्यंत काम पूर्णत्वास नेवून सदरची जेट्टी मेरिटाईम बोर्डाला हँन्ड ओव्हर करणार असल्याची माहिती मुखर्जी यांनी दिली.