Navi Mumbai MIDC | नवी मुंबई एमआयडीसीत गटार साफ करताना 2 कामगारांचा मृत्यू

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबई एमआयडीसीत (Navi Mumbai MIDC) गटार साफ करायला उतरलेल्या दोन सफाई कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तिसरा कामगार दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. गटार साफ करत असताना अचानक त्यातील गाळातून उग्र वास येऊ लागला आणि त्यामुळे दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. (Navi Mumbai MIDC)

 

एमआयडीसीतील रासायनिक कारखाने अनेकदा रात्रीच्या अंधारात खरखान्यातील सांडपाणी प्रक्रिया न करता पाणी सोडून देतात, असा आरोप नेहमीच केला जातो. आता या घटनेमुळे या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. जय झाडखंड आणि संदीप हंबे असे मृत कामगारांची नावे आहेत, तर वसंत झाडखंड उपचार घेत आहे.

नवी मुंबई एमआयडीसीतील (Navi Mumbai MIDC) रबाळे भागातील गटार तुंबले होते. त्यामुळे त्याच्या सफाईचे काम ‘बिटकॉन ऑफ इंडिया’ कंपनीला देण्यात आले. शनिवारी हे काम करत असताना प्रोफॅब इंजिनियरिंग प्रा.लि. कंपनीसमोरील गटार चेंबर उघडून सफाईचे काम सुरू होते. त्यावेळी गटारात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याचे लक्षात आले. त्याचा उपसा करण्यास विजय झाडखंड, संदीप हंबे आणि विजय हॉदसा हे तिघे आत उतरले होते.

 

पण या गटारातून अचानक उग्र वास यायला लागला.
त्यानंतर पर्यवेक्षक म्हणून काम करणारा दत्तात्रय गिरिधारीने त्याच्या कामगारांना आवाज दिला,
पण प्रतिसाद न मिळाल्यावर आसपाच्या लोकांच्या मदतीने त्याने तिघांना बाहेर काढले. तिघेही बेशुद्ध अवस्थेत होते,
त्यांना त्याच अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी जय झाडखंड आणि संदीप हंबे यांना मृत घोषित केले. एमआयडीसीतील गटारात रासायनिक घटकांचा समावेश असू शकतो,
हे लक्षात घेऊन कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साधने पुरवणे आवश्यक होते.
मात्र, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले.
तसेच रात्रीच्या वेळेस अनेकदा उग्र वास येत असलेल्या तक्रारीकडे रासायनिक कारखानदार आणि
प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या दुर्लक्षामुळे दोघांचा जीव गेला, असा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.

 

Web Title :- Navi Mumbai MIDC | two workers died of suffocation while cleaning chambers in midc in navi mumbai news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार