‘त्या’ प्रकरणी भाजप नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी त्यांच्या इतर ९ साथिदारांसह मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांना बेदम मारहाण केली होती. ही घटना २९ एप्रिल रोजी रात्री घडली होती. याप्रकरणात नगरसेवक चिपळेकर याच्यासह त्याच्या ९ साथिदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटळला आहे.

अलिबाग सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अटकेच्या भीतीने नगरसेवकासह सर्वजण फरार झाले आहेत. या सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी कामोठे पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. एक पथक अलिबागमध्ये दाखल झाले आहे.
पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर याच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यानेच आपले पैसे पकडून दिल्याचा राग चिपळेकर याच्या मनात होता. यातूनच त्याने प्रशांत जाधव यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. यामध्ये प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या गुंडांना आवरावे, अन्यथा आमची वेळ येईल, असा इशारा बाळा नांदगावकर दिला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like