धक्कादायक ! नवी मुंबईतील बार मालकाचा मेंगलोरमध्ये गळा आवळून खून, नंतर रचला अपघाताचा बनाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  नवी मुंबईतील सीबीडी येथील बार मालकाची हत्या केली गेली आहे. कर्नाटकातील मेंगलोरमध्ये त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. नवी मुंबईतील माया बारचे मालक वरिष्ठ यादव यांची गळा आवळून हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. 
 
नवी मुंबईतील माया बारचे मालक वरिष्ठ यादव यांना कर्नाटकात मेंगलोरमध्ये बोलावण्यात आले होते. तेथेच त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यांना मृतदेह एका कारमध्ये ठेवून ती कार दरीत ढकलण्यात आली होती आणि हा अपघात असल्याचे भासवले गेले. परंतु शवविच्छेदन अहवालात हे समोर आले की यादव यांची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. 
 
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या हत्येमागील सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. ही हत्या आर्थिक वादातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.