गणेश नाईकांच्या प्रवेशापूर्वीच भाजपमध्ये नाराजीनाट्याला सुुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजप शिवसेनेत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे आणि अनेक करणारही आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेदांना सुरुवात झाल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक, त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक हे राष्ट्रवादीच्या आणि इतर एकूण ५७ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये धुसफुस दिसू लागली आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्यांच्या प्रवेशावरून मंदा म्हात्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाविषयी मंदा म्हात्रे यांनी त्यांची प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. गणेश नाईक हे स्वतःचे साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, अशी टीका मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर केली आहे. ही त्यांची स्टंटबाजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते नक्कीच न्याय देतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. मंदा म्हात्रे यांची नाराजी भाजप दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

भाजपमध्ये होणाऱ्या इंकमिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक आमदार, नगरसेवक कार्यकर्ते आहेत. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांचे चिरंजीव संदीप नाईक आणि ५७ नगरसेवकांनी त्यांच्यावर दबाव टाकला गेला. त्यानंतर पक्षाला राजीनामा देण्याचे इशारे देण्यात आले, असं सर्व नाट्यमय प्रकार घडला. त्यानंतर आता गणेश नाईक भाजप प्रवेशासाठी तयार झाले आहेत. त्यांच्या प्रवेशाआधीच भाजपमधील नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –