खळबळजनक ! सहाय्यक निरीक्षक (API) भूषण पवार यांची पोलिस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येथील एपीएमसी पोलिस ठाण्यात कार्यरत असणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार असे आत्महत्या करणार्‍या पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे.

भूषण पवार यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळं आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर ते स्वतःच्या कक्षात जाऊन बसले होते. काही वेळानंतर त्यांच्या कक्षातून गोळी झाडल्याचा आवाज बाहेर आला त्यानंतर इतरांनी कक्षाच्या दिशेने धाव घेतली. गेल्या काही दिवसांपासून भूषण पवार हे मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. अलिकडील काळात ते खुपच शांत रहायचे. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा देखील करण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याबाबत कोणाकडे काही एक सांगितले नव्हते. दरम्यान, पवार यांनी स्वतः गोळी झाडून आत्महत्या का केली याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.