Navi Mumbai Police | रात्रभर फिर्य़ादीला मारहाण करत केला जातीचा उल्लेख, पोलीस उपायुक्तांचा पाहुणा असल्याचे समजताच…; सहायक पोलीस निरीक्षकावर FIR

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navi Mumbai Police | चायनिज चालकाकडून मारहाण झाल्यानंतर जखमी झालेला तरुण पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेला. मात्र सहायक पोलीस निरीक्षकांनी चायनिज चालकाला पाठीशी घालत तक्रार देण्यासाठी आलेल्या जखमी तरुणालाच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय (Navi Mumbai Police) क्षेत्रातील कलंबोली पोलीस ठाण्यात (Kalamboli Police Station) घडली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील (API Dinesh Patil) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तक्रार देण्यास आलेल्या व्यक्तीला मारहाण (Beating) करणे, अपमानास्पद वागणूक देणे इत्यादी कलमांतर्गत दिनेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्याप अटक केलीली नाही.

 

याबाबत विकास उजगरे (Vikas Ujagare) यांनी कलंबोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे एका रुग्णालयात काम करत असून 6 जानेवारीला काम संपवून काही मित्रांसोबत त्यांनी पार्टी केली. त्यानंतर ते सुधागड महाविद्यालयाजवळ (Sudhagad College) असलेल्या दत्तकृपा चायनीज हॉटेलमध्ये (Chinese Hotel) जेवण करण्यासाठी गेले. जेवण करत असताना त्यांचा मित्र तुषार यादव आणि वेटर यांच्यात ऑर्डर घेण्यावरुन शाब्दिक बाचाबाची झाली. यात विकास यांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद वाढू दिला नाही.

 

काहीवेळाने ते निघून गेले मात्र यादव यांनी पिशवी हॉटेल वरच विसरल्याचे लक्षात आल्यावर विकास हे पिशवी आणण्यासाठी गेले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी विकास यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तावडीतून सुटका करुन त्यांनी नियंत्रण कक्षाला (Control Room) फोन करुन मदत मागितली. त्यावेळी पोलीस त्याठिकाणी आले. त्यांनी कलंबोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यामुळे विकास उजगरे हे पायी चालत कलंबोली पोलीस ठाण्यात आले. परंतु ते पोलीस ठाण्यात पोहचण्यापूर्वीच हॉटेल मालक निलेश भगत (Nilesh Bhagat) व एक कामगार त्या ठिकाणी पोहचले होते.

मारहाण झाल्यामुळे विकास यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी रुग्णालयात जाण्याची विनंती केली. मात्र सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांनी विकास यांची तक्रार नोंदवून घेतली नाही तर त्यांना रुग्णालयात देखील नेले नाही. उलट त्यांनाच कमरपट्ट्याने मारहाण केली आणि जातीवाचक उल्लेख करुन त्यांच्या अंगावर थुंकले. दिनेश पाटील हे पहाटेपर्यंत विकास यांना मारहाण करत होते.

 

काही वेळाने विकास याच्या परिचित एका पोलीस कर्मचाऱ्याने विकास हा पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे (DCP Vinayak Dhakkane) यांचा नातेवाईक असल्याची माहिती दिली. त्यानंतर दिनेश पाटील यांनी विकास यांच्याशी गोड बोलून त्यांना रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या विकास यांनी तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतले. यादरम्यान त्यांची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याच्या अर्जावर बळजबरीने सही घेण्यात आली होती.

रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या सोबत घडलेला
सर्व प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला.
त्यानुसार सहायक पोलीस आयुक्तांनी (ACP) त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
दिनेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पाटील यांची चौकशी सुरु असून योग्य ती कारवाई केली जाईल,
अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे (DCP Pankaj Dahane) यांनी दिली.

 

 

Web Title :- Navi Mumbai Police | a case has been registered against the assistant police
inspector who assaulted a person who came to file a complaint in navi mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा