Zomato च्या महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – झोमॅटोच्या महिला कर्मचाऱ्यानी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९ मधील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यानं वाहतूक पोलिसांनी बाईक टोईंग केली. वाहतूक पोलिसांनी बाईक टोईंग केल्याच्या रागातून महिलेनं पोलिसांसोबत अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली. या महिलेला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

ही महिला ८ ऑगस्ट रोजी वाशी येथील सेक्टर ९ मध्ये गेली होती. त्यावळी तिने तिचे वाहन नो पार्किंगमध्ये लावले. त्यानंतर कर्तव्यावर असलेले मोहन सलगर यांनी कारवाई करण्यासाठी गाडीचा फोटा काढला. त्यावेळी अटक करण्यात आलेली प्रियंकाही उभी होती. तुम्ही माझा फोटो का काढता असे तावातावाने विचारत तिने पोलिसांशी हुज्जत हालण्यास सुरुवात केली. तसेच महिला पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हा प्रकार सुरु असताना टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की या व्हिडिओची दखल मुंबई पोलिसांनी घेतली. सुरवातीला पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र नवी मुंबई पोलिसांनी मुलीवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मोहन सलगर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर झोमॅटोशी संपर्क करून मुलीचे नाव, पत्ता घेऊन तिचा शोध घेण्यात आला. त्यानंतर दोन तासांनी पोलिसांनी प्रियंका मोगरेला वाशी येथील सेक्टर १७ मधून अटक करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त