Navi Mumbai Property Tax | नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा; ऐरोली आणि बेलापूर मतदार संघातील विकासकामांचा CM एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

BMC च्या धर्तीवर 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navi Mumbai Property Tax | मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने Navi Mumbai Municipal Corporation प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिल्या. (Navi Mumbai Property Tax)

 

ऐरोली (Airoli Assembly Constituency) आणि बेलापूर मतदारसंघातील (Belapur Assembly Constituency) विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik), आमदार मंदाताई म्हात्रे (MLA Manda Mhatre), सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (Cidco MD) संजय मुखर्जी (Dr. Sanjay Mukherjee IAS), नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी (IAS Sonia Sethi), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन (S.V.R. Srinivas IAS), नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर (IAS Rajesh Narvekar), यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बारावी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना ज्याप्रमाणे कायमस्वरूपी नोकरी समाविष्ट करून घेण्यात आले त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको मध्ये कार्यरत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. सिडकोतर्फे आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी नागरिकांसाठी अभय योजना राबवावी अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऐरोली – कटाई उन्नत मार्गावर मुंबईच्या दिशेने येण्या आणि जाण्यासाठी मार्ग, पामबीच – घनसोली ऐरोली रस्त्याचे (Ghansoli-Airoli Palm Beach Road) कामासह मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

 

Advt.

तसेच यावेळी बेलापूर मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी वाशी येथे होणारे महाराष्ट्र भवन
उत्तमरित्या साकारावे. हे भवन राज्याच्या संस्कृतीचे ओळख करून देणारे असावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title :  Navi Mumbai Property Tax | A proposal should be submitted for property tax exemption for
houses in Navi Mumbai; CM Eknath Shinde reviewed the development works in Airoli and Belapur constituencies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा