शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, आमदाराच्या गाडीची तोडफोड

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या दोन गटात मजबूत राडा झाला. या राड्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर या गाडीची तोडफोड केली. कामाचं श्रेय घेण्यावरून हा वाद झाल्याचे समजत आहे.

ऐरोली येथे महापालिकेच्या सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. आज या सभागृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटनाचं श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. या दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात संदीप नाईक यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.

या हाणामारीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शिवसेनेने संदीप यांच्यावर जो हल्ला केला त्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला. या हाणामारीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, दिघा, घणसोली बंद याठिकाणी बंद करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते संदीप नाईक हे माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आहेत. संदीप नाईक हे ऐरोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.

Loading...
You might also like