‘त्या’ दहशतवादी मेसेज प्रकरणातील आरोपीचं नेपाळ ‘कनेक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उरणमधील खोपटा पुलावर दहशतवादी मेसेज लिहिल्याप्रकऱणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नेपाळ कनेक्शन तपासात समोर आलं आहे. त्याने नेपाळमध्ये फोन केल्याचे आणि त्याला तेथून फोन आल्याचे समोर आले आहे.

आमीर उल्लाह शेख याची पोलीस कोठडी न्यायालयाने १७ जूनपर्यंत वाढवली आहे. त्याला याअगोदर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता ती पुन्हा वाढविण्यात आली आहे.

आमीर शेखकडून १ मोबाईल फोन आणि मार्कर पेन हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्याकडील आणखी २ मोबाईलची पाहणी करण्यासाठी त्याची कोठडी वाढवून देण्याची विनंती पोलिसांनी केली.

आहे नेपाळ कनेक्शन ?

आमीर उल्लाह याच्याकडे पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याचे नेपाळ कनेक्शन समोर आले आहे. त्याचे फोन कॉल पोलिसांनी तपासले तेव्हा त्याने आपल्या मोबाईलवरून नेपाळमध्ये फोन केल्याचे आणि त्याला तेथून फोन आल्याचे समोर आले आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली आहे.

होडीचं वर्णन

विशेष बाब म्हणजे घटनास्थळी एक होडी होती. त्याने पुलावर लिहिलेल्या मजकूरामध्ये ज्या होडीचं वर्णन लिहिलं आहे. त्या अनुषंगाने तो काही तरी कोडवर्डमध्ये सांगत आहे असा संशय पोलिसांना आहे.

काय आहे आमीरने लिहिलेला मजकूर ?

दुनिया ओर पुरा कैनात हमारे लिए छोटी नाव है, जिस नाव में बैठकर मछली पकडती हो और उसी नाव में बैठकर खुदा की खुदाई को ललकारे हो, जहाज, पोर्ट, एअरपोर्ट, गोवा, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, गॅस पाईपलाईन असा उल्लेख त्यात आहे. तर त्याने या मजकूरासोबत काढलेल्या अनेक चित्रांमध्ये जेएनपीटी जहाज. विमानतळ, पेट्रोलपंप दाखविण्यात आले आहेत. तर संदेश हा देवनागरी आणि इंग्रजी भाषेत लिहिला आहे. त्याच्या मेसेजमध्ये धोनी, आम आदमी पार्टी, केजरीवाल, हाफिज सईद, कुर्ला, गोरखपुर यांचा उल्लेख आहे.

कोण आहे आमीर उल्लाह शेख ?

उरणच्या खोपटा पुलावर मजकूर लिहीणारा आमीर उल्लाह शेख हा मुळचा उत्तरप्रदेशातील सिद्धार्थ नगरचा राहणारा आहे. तो गेली १० वर्षे आपल्या तीन भावंडांसोबत खोपटा येथे राहतो. तो एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो. त्याला अटक केली तेव्हा तेव्हा तो मनोरुग्ण असल्याचे बतावणी आमीरने केली होती.

त्याच्या कुटुंबियांकडून कोणताही वैद्यकिय अहवाल मिळालेला नाही. त्याच्याकडे असलेले ३ मोबाईल त्याने तोडून फेकून दिले आहेत. त्याने खोपटा पुलावर मजकूर लिहिण्यापुर्वी १ मोबाईल तते मोबाईल फेकून दिले. तर तो मजकूर लिहिल्यानंतर एक मोबाईल त्याने तोडून टाकला.

आरोग्य विषयक वृत्त –

 

‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे

आता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका