‘सायकल ऑन रेन्ट’ला नवीमुंबईत तुफान प्रतिसाद

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – आता पुण्यापाठोपाठ नवी मुंबईलमध्ये देखील भाडेतत्वावर सायकल उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये दिवसोंदिवस वाहतुककोंडीची समस्या वाढत आहे हे आपण सर्वजण जाणतोच. आता यावरच  मुंबई महापालिकेने उपाय शोधून काढला आहे. नवी मुंबई महापालिकेने नवीन मुंबईमधील नेरूळमध्ये भाडेतत्वावर सायकल उपलब्ध करुन देण्याची सोय सुरु केली. महापालिकेने भाड्याने सायकल देण्याच्या सुरु केलेल्या या उपक्रमाला नेरुळमधील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. ही सुविधा सुरु झाल्यानंतर अवघ्या ४० दिवसांमध्ये १० हजारहून अधिक नागरिकांनी मोबाइल अॅपवरून या सायकली भाड्याने चालवण्यासाठी नाव नोंदणी केल्याचं समोर आलं आहे.

‘येलू’ या भाड्याने सायलक देणाऱ्या स्टार्टअप कंपनीच्या मदतीने  महापालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. सध्या तरी या उपक्रमाअंतर्गत शहरातील ७ सायकल स्टेशन उभारण्यात आले असून त्यामध्ये १ हजार सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शिवाय  या उपक्रमाला नेरुळमधील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

आता या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख सायकल नवी मुंबईकरांना उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा मानस आहे. पुढील टप्प्यामध्ये बेलापूरमध्ये ६० ठिकाणी अशी सायकल स्टेशन्स उभारून ही योजना बेलापूरवासियांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शहराचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या उद्देशाने लवकरच ही मोहिम नवी मुंबईमधील इतर भागांमध्येही राबवण्याची पालिकेची योजना आहे.

‘येलू’ने बंगळुरूमध्ये सायकल भाड्याने देण्याचा उपक्रम यशस्वी केल्यानंतर आता त्यांना मुंबईतही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान आता ज्याप्रमाणे सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या त्याप्रमाणे सायकल चालवण्यासाठी वेगळे सायकल ट्रॅक्सही तयार करण्यात यावे अशी मागणीही काही सायकल प्रेमींनी व्यक्त केली जााताना दिसत आहे. मुख्य म्हणजे ही योजना नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाली अाहे. शिवाय नवीन मुंबईकर आता आणखीन फीट अॅण्ड फाइन होतील असं मत ही सेवा वापरणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त रामस्वामी एन यांनी या योजनेला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान यावर बोलताना  रामस्वामी एन म्हणाले की, “अशी योजना सुरु करणाऱ्या इतर शहरांपेक्षा नवी मुंबईमध्ये या योजनेला जास्त प्रतिसाद मिळाला आहे. १० हजारहून अधिक नागरिकांनी या योजनेसाठी आपले नाव नोंदवले आहे. तसेच ही सेवा शहरातील इतर भागांमध्ये पुरवण्याची मागणीही केली जात आहे.” इतकेच नाही तर आता आम्ही अशी सेवा बेलापूरमध्येही सुरु करणार असल्याचे रामस्वामी यांनी सांगितले. मुख्य म्हणजे तीन वर्षांमध्ये शहरात एक लाख सायकल उपलब्ध करुन देण्याचे आमचा उद्देश असल्याचे रामस्वामी म्हणाले.

काय आहे ही योजना?

नेरुळ परिसरात एकूण सात सायकल स्टेशन्स आहेत

१००० हजार सायकल्स या योजनेत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
१० हजार मुंबईकरांनी अॅप्लिकेशनवरून या योजनेसाठी नोंदणी केली आहे (१३ डिसेंबर २०१८ पर्यंतची आकडेवारी)
सायकलमधील डिजिटल लॉक्स हे थीफप्रूफ आहेत.
प्रत्येक सायकलवर जीपीएस लावण्यात आल्याने ती कुठे आहे याबद्दलची माहिती कंपनीला मिळते. त्यामुळे ती चोरीला जाण्याची शक्यता नाही.
किती आहे भाडे
अर्ध्या तासासाठी १० रुपये
पहिली फेरी अवघ्या १ रुपयामध्ये अर्ध्या तासासाठी उपलब्ध आहे
३० फेऱ्यांसाठी २०० रुपये तर ६० फेऱ्यांसाठी ३०० रुपये
अशी करा नाव नोंदणी
तुमच्या स्मार्टफोनवर येलू (Yulu) अॅप्लिकेशन डाऊनलोड करा.
या अॅप्लिकेशनवर तुमच्या जवळच्या सायकल स्टेशनची माहिती उपलब्ध असेल
अॅप्लिकेशनवरून तुम्ही या सेवेसाठी पैसे भरू शकता
तुम्ही तुमच्या सोयीनुसार अॅप्लिकेशनमध्येच सायकल कुठून कुठल्या सायकल स्टेशनपर्यंत चालवणार आहात ते निश्चित करु शकता.
सायकल स्टेशनवरील सायकल अनलॉक करण्यासाठी सायकलवरील बारकोड अॅप्लिकेशनमधून स्कॅन करा
तर दुसऱ्या सायकल स्टेशनवर सायकल ड्रॉप केल्यानंतर एण्ड हा पर्याय सिलेक्ट करुन सायकल पुन्हा लॉक करता येते.