Navin Marathi Shala | शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील महिलादिन नवीन मराठी शाळेत उत्साहात साजरा

पालक संघासाठी विविध स्पर्धांचे आयोजन

पुणे : Navin Marathi Shala | दि. ८ मार्च २०२३ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. हुजूरपागा हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका व नवीन मराठी शाळेच्या माजी विद्यार्थिनी अलका काकतकर व डॉ.अमोल साळुंखे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून समस्त नारी शक्ती ला अभिवादन केले व स्त्रियांचा सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे असे सांगितले. (Navin Marathi Shala)

प्रमुख अतिथी अलका काकतकर यांनी पालकांनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले.”पालकांच्या हाती देशाचे भवितव्य आहे, विद्यार्थ्यांच्या भावविश्व विकासासाठी माता पालकांचे योगदान मोलाचे आहे.” असे सांगितले. डॉ.अमोल साळुंखे यांनी आपल्या भाषणात स्त्रियांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याचे सखोल मार्गदर्शन केले व आयुर्वेदातील काही महत्वाची सूत्रे सांगितली. (Navin Marathi Shala)

पालकांसाठी महिला दिनानिमित्त घेतलेल्या पोस्टर बनवा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला. स्पर्धेसाठी जमा झालेल्या सर्व पोस्टर्स चे प्रदर्शन शाळेच्या प्रार्थना हॉल मद्ये भरवण्यात आले होते.

महिला दिनानिमित्त मातापालकांनी वीरांगना हा विशेष कार्यक्रम सादर केला राजमाता जिजाऊ ,
राणी लक्षमीबाईंनी,अहिल्याबाई होळकर, कल्पना चावला, प्रतिभा पाटील, आनंदीबाई जोशी, सिंधुताई सपकाळ,
लता मंगेशकर अश्या विविध व्यक्तिरेखा माता पालकांनी साकारल्या होत्या.
विद्यार्थ्यांनी व उपस्थित शिक्षक ,पालकांनी उस्फूर्तपणे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात या कार्यक्रमाचे कौतुक केले.
सोनाली मुंढे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भाग्यश्री हजारे यांनी आभार मानले. तनुजा तिकोने ,धनंजय तळपे,
प्रतिभा पाखरे , सौम्या कुलकर्णी यांनी आयोजन केले.

Web Title : Navin Marathi Shala | Women’s Day in Navin Marathi Shala

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Devendra Fadnavis | म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन