काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगमध्ये ‘जुंपली’

चंदीगड : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. अमरिंदर सिंग सिद्धूबद्दल बोलताना म्हणाले, सिद्धू माझ्या जागी मुख्यमंत्री बनू इच्छित आहे. तो काँग्रेसची प्रतिमी मलिन करत असून पक्षाने त्याच्यावर कारवाई करायला हवी.

पत्रकारांशी बोलता पुढे ते म्हणाले, जर सिद्धूने काँग्रेसची विचारधारा स्विकरली असती तर त्याने निवडणुकी दरम्यान तक्रारी केल्या नसत्या. अमरिंदर यांनी पतियाळा मतदान केंद्रात मतदान करून आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सिद्धूवर हल्ला चढवला.

सिद्धूवर कारवाई करायची कि नाही हे पक्ष श्रेष्ठी ठरवतील. मात्र, काँग्रेसनं शिस्त भंग केल्याचे सहन करू नये. सिद्धू आणि मझ्यात कोणतेही वाद नाहीत. ते महत्वकांक्षी असून त्यांना माझ्या जागेवर मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. अमरिंदर सिंग यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेस निवडणूक हारली तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.

तत्पूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर आरोप केला होता. अमरिंदर यांच्यामुळे पंजाबच्या प्रभारी आशा कुमारी यांना अमृतसरमधून उमेदवारी देण्यात आली नाही. मात्र अमरिंदर यांनी त्यांचे हे आरोप फेटाळून लावले होते. आशा कुमारी यांना बठिंडा येथू उमेदवारी देत होतो मात्र त्यांनीच तेथून निवडणुक लढवण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले.