नवज्योत सिंग सिद्धू राहुल गांधींच्या भेटीला, राजीनामा देणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरु झाले होते. अनेक मोठ्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच आपला राजीनामा केंद्रीय समितीसमोर सादर केला होता. त्यानंतर आता अनेक राज्यात अंतर्गत कलह आणि गटबाजी समोर आली आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थानबरोबरच आता पंजाबमधील देखील वाद समोर आला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादामुळे पंजाबमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर या दोघांमध्ये आरोप प्रत्त्यारोप सुरु झाले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सिद्धू याचे खाते बदलत त्यांना तुलनेने कमी महत्वाचे खाते दिल्याने नाराज झालेल्या सिद्धू यांनी थेट दिल्ली गाठत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत त्यांना आपली नाराजी सांगितली. सिद्धू यांनी आपल्या बदललेल्या खात्याचा पदभार अजून स्वीकारलेला नाही. त्याचबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या आठ समित्यांत देखील सिद्धू यांचा समावेश न करत त्यांना धक्का दिला आहे. या समितीत त्यांनी महत्वाच्या मंत्र्यांचा समावेश केला असून सिद्धू यांचा विचार न करता त्यांना एक प्रकारे हीन वागणूक दिली असल्याची चर्चा पंजाबमध्ये सुरु आहे.

दरम्यान, सिद्धू यांनी राहुल गांधींची भेट घेतली असताना त्यावेळी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल देखील उपस्थित होते. त्यामुळे या भेटीनंतर ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतात कि राहुल गांधी त्यांना सबुरीचा सल्ला देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय