ठोको ताली ! नवज्योत सिध्दू यांचा काँग्रेस सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा, CM अमरिंदर सिंह यांच्याशी पटलंच नाही

पंजाब : वृत्तसंस्था – पंजाबचे बहुचर्चीत मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामा पत्र काँग्रेस अध्यक्षांना पाठवले आहे. याबाबत स्वतः सिद्धू यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. तसं पाहिले तर हा राजीनामा १० जूनलाच देण्यात आला आहे. मात्र त्याचा खुलासा सिद्धू यांनी आज केला आहे. ट्वीट करत राजीनाम्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की मी माझा राजीनामा पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना दिला आहे.

मागील काही दिवसांपासून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांच्यात वाद असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश न आल्याने अमरिंदर सिंह यांनी यासाठी सिद्धू यांना जबाबदार ठरवले होते. तर लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर ६ जुनला पंजाबच्या मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली आणि सिद्धू यांच्यासह अधिक मंत्र्‍याचे विभाग बदलण्यात आले होते.

नवज्योत सिद्धू यांच्याकडे आधी स्थानिक स्वशासन विभाग होते. मात्र नंतर त्यांना ऊर्जा आणि नवीन ऊर्जा विभाग देण्यात आले. त्यानंतर सिद्धूंनी या विभागाचे काम हाती घेतलेच नाही. तसंच विभागाच्या कोणत्याही सभेला किंवा बैठकीला सिद्धू गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाही करण्यात आल्या. मात्र आज त्यांनी राजीनामा सार्वजनिक करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सिद्धू यांनी आपला राजीनामा राज्यपालांना पाठवण्याऐवजी काँग्रेस अध्यक्षांना पाठवला आहे. त्यामुळे त्यांचा हा राजीनामा ग्राह्य धरला जाईल की नाही हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तसंच ते मंत्रिमंडळात राहणार की नाही यावरही सर्वांचे लक्ष आहे.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा