Navjot Singh Sindhu | ‘रोड रेज’ प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला 1 वर्ष जेलची शिक्षा; जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Navjot Singh Sindhu | रोड रेज (Road Rage Case) प्रकरणी पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sindhu) यांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दणका दिला आहे. 34 वर्षे जुन्या रोड रेज (Road Rage Case) प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. (Navjot Singh Sidhu gets a year jail in road rage case)

 

रोड रेज प्रकरणी सिद्धूने (Navjot Singh Sindhu) आपल्याविरुद्ध दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका (Review Petition) फेटाळण्याची विनंती सुप्रीम कोर्टात केली होती. त्यामध्ये ही घटना 33 वर्षांपूर्वी घडली असून, याचिका कायम ठेवण्यायोग्य नाही. तसेच या खटल्यातील शिक्षेत बदल करू नये, अशी विनंती देखील त्यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र न्यायलयाकडून एक मोठा निर्णय देत 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

दरम्यान, 1988 मध्ये पटियाला येथे कारने जात असताना सिद्धूने ज्येष्ठ नागरिक गुरनाम सिंग (Gurnam Singh) यांना धडक दिली होती. तसेच रागाच्या भरात सिद्धूने त्यांना धक्काबुक्कीही केली त्यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनेनंतर पटियाला पोलिसांकडून (Patiala Police) सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर सिंग (Rupinder Singh) यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

तसेच, 1999 साली ट्रायल कोर्टाने सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती, परंतु, अमृतसरमधून भाजपचे खासदार
असताना पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab Haryana High Court) 2006 साली सिद्धूला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
शिक्षेनंतर त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर सिद्धूने हाय कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज न्यायालयाने निकाल दिला आहे.

 

Web Title :-  Navjot Singh Sindhu | punjab congress leader navjot singh sidhu in road rage case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | राज ठाकरेंनी अजित पवारांचं ‘ते’ आव्हान स्विकारलं? पुण्यात ‘या’ दिवशी होणार ‘राज’गर्जना

 

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’

 

Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती