सिध्दूंचा ‘त्या’ वक्तव्यावरून यू-टर्न, म्हणे ‘माझेही त्यांच्याशी युद्धच!’

पंजाब : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील आंतकावादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. त्यावर काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिध्दू यांनी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतली होती. त्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता सिध्दू यांनी बोलून प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे.

आंतकवादाला वेळीच ठेचने गरजेचे आहे. आंतकवादासमोर गुडघे टेकावेत. आतंकवाद देशाला पोखरत आहे. देशात अशांतता पसरावी, देशाचा विकास थांबावा, ही आतंकवाद्यांची इच्छा आहे. हे आपल्याला नको आहे, असं सिध्दूंनी सांगितलं.

ज्यांनी हा अपराध केला होता. त्यांना ओढत-फरफटत आणूण त्यांना अशी शिक्षा दिली पाहीजे. ही शिक्षा असावी की पिढ्यांन-पिढ्या लक्षात राहिली पाहीजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

पुलवाना हल्ल्याची ज्यांनी जबाबदारी घेतली, त्यांना १९९९ मध्ये कंधार मध्ये कोणी सोडले. कोणाची जबदारी होती, असा सवाल त्यांनी केला. आपलं युद्ध त्यांच्यासोबत आहे. का सैनिक मरत आहेत,?  यावर कायमस्वरूपी उपाय केला जावा. यांच्याशी आपल्या सर्वांचे युद्ध आहेच. माझेही त्यांच्याशी युद्ध आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.