Navneet Kaur Rana | बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला का?, ‘मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून, मला कोणी रोखू शकत नाही’ – नवनीत राणा आक्रमक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Kaur Rana | राज्यात सध्या भोंग्यांवरून (Loudspeaker) राजकारण सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या वादामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांनी उडी घेतली आहे. राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार असल्याचं म्हटलं आहे.

 

नवनीत राणा यांनी येत्या 23 एप्रिलला मुंबईत (Mumbai) येणार असल्याचं सांगितलं आहे.
मात्र यावरून शिवसेनेचे नेते युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
यावर बोलताना, तुम्हाला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे का ?, असा सवाल नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांनी केला आहे.

 

आमच्या रक्तात धमकी देणे नाही. मला धमकी दिली की ज्या पायांवर येणार त्यावर जाऊ देणार नाही.
पण मी त्यांना सांगते की, मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची (Vidarbha) सून असून ही दुहेरी ताकद माझ्या पाठिशी असल्याने मला कोणीच रोखू शकत नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, ज्याच्यात ताकद असेल त्यांनी वेळ दिला नाही म्हणून आम्ही वेळ दिला की आम्ही कोणत्या तारखेला तिथे येऊन हनुमान चालीसा पठण करणार आहोत.
त्याप्रमाणे आम्ही मुंबईत जाणार असून आम्ही हनुमान चालीसा तिथे म्हणणार हे नक्की आहे,
असा ठाम निर्धार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Navneet Kaur Rana | mp navneet rana criticizes shiv sena and cm uddhav thackeray over hanuman chalisa in front of matoshree

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा