जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – जनतेशी आघाडी माझी, जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती”, “जीत पक्की, टी.व्ही. नक्की” असे पोस्टर युवा स्वाभिमान पार्टीकडून वायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे नवनीत कौर राणा पुन्हा अमरावतीतून लोकसभा लढवण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, नवनीत कौर राणा पुन्हा अमरावतीतून लोकसभा लढवण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नवनीत कौर राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. नवनीत कौर राणा यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार का ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

इतकेच नव्हे तर, “जनतेशी आघाडी माझी, जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती”, “जीत पक्की, टी.व्ही. नक्की” असे मेसेज युवा स्वाभिमान पार्टीकडून वायरल होताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, नवनीत कौर राणा यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र आता ‘टीव्ही’ या मतदान चिन्हासह त्या युवा स्वाभिमानी पक्षातूनच निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

काँग्रेसच्या ‘या’ बालेकिल्ल्यातच राहुल गांधींविरोधात ‘पोस्टरबाजी’

काठ्या, चष्मे वाटणे, त्याला विकास म्हणत नाही ; शिवतारेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अधिकारी व ठाण्यातील घडामोडींवर ‘नायका’चा वॉच

रोहित शेट्टीचा संघर्षमय प्रवास

डॉ. सुजय विखे जाणार खा. गांधी, माजी आ. राठोड यांच्या भोटीला

Loading...
You might also like