Bachhu Kadu On Navneet Ravi Rana | राणा दांपत्याला मंत्री बच्चू कडूंचा कडक इशारा, म्हणाले – ‘वाघाची नखं अजूनही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bachhu Kadu On Navneet Ravi Rana | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्यावरुन (Loudspeaker On Masjid) मोठं विधान केलं होतं. भोंगे न उतरल्यास मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा दिला. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम (Ultimatum) देखील राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला. यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच विषयावरुन आता राज्यात आरोपांचे छत्र सुरू आहे. यानंतर आता अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला. यावरुनही राणा दांपत्य आणि शिवसेना वाद (Navneet Ravi Rana Vs Shivsena) रंगल्याचं दिसत असतानाच आघाडी सरकारमधील मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही प्रतिक्रिया दिली. (Bachhu Kadu On Navneet Ravi Rana)

बच्चू कडू म्हणाले, “खरं तर अतिशय मूर्खपणा आहे. कोणते मुद्दे घ्यावेत याचं कोणतंही भान राणांना राहिलेलं दिसत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु आहे. शिवसेनेने जे आव्हान दिलं आहे त्यामध्ये आम्हीदेखील त्यांच्यासोबत आहोत. प्रहारचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असतील,” असं त्यांनी म्हटलं आहे. (Bachhu Kadu On Navneet Ravi Rana)

पुढे ते म्हणाले, “या जिल्ह्याचे ते खासदार, आमदार आहेत. त्यांचा अपमान होऊ नये असं आम्हाला वाटते. सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन आपला अपमान करण्याच्या सोयीने ते जात आहेत. उलट निवडून येताना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी आहे.’ त्याचबरोबर, ज्या विचारधारेवर निवडून आले ती कायम ठेवली नाही उलट त्यावर आक्रमण करत आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही, असा इशारा देत ‘वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं,’ असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

राणा दांम्पत्याचा राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा –

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करत हनुमान चालिसा पठणाचे आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांनाही आपल्या घरातच हनुमान चालिसा पठण करावे, असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. आता नवनीत राणा आणि रवी राणा यांनी येत्या 23 तारखेला मुख्यमंत्री ठाकरेंचे मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय.

Web Title : Navneet Kaur Rana Vs Shivsena | shivsena workers gather on csmt railway
station to stop mp navneet kaur rana from going on matoshree for hanuman chalisa

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा