Navneet Rana | खासदार नवनीत राणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने; म्हणाल्या…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावती येथे डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या सभेत बोलताना खासदार नवनीत राणा यांनी (Navneet Rana) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोयचं पण इतर राज्यांत देखील त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. समाजातील घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि धडाकेबाज कामासाठी नेहमीच देवेंद्र फडणवीस आपले वाटतात. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्यासाठी ते मुख्यमंत्रीच आहेत. अशी स्तुती खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देवेंद्र फडणवीस यांची केली.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा केली गेली आहे. त्यात अमरावती पदवीधर मतदारसंघातून डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ अमरावती येथील दसरा मैदानावर भाजप नेत्यांची सभा पार पडली. या सभेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा (Navneet Rana), शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार रवींद्र पोटे उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जेथे जेथे पाऊल पडले मग ते गुजरात असो वा गोवा तिथे भारतीय जनता पक्षाला नेत्रदिपक यश मिळालं. फडणवीस यांचे कामं बोलतं.
त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्याचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे,
पण इतर राज्यात देखील त्यांच्या कामाची चर्चा होत आहे. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण
आमच्यासाठी मात्र ते आमच्या मनातील मुख्यमंत्रीच आहेत.’ असे गौरवोद्गार यावेळी बोलताना खासगार नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल काढले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदासर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, ‘मागील सरकारमध्ये कुणाचं वर्क फ्रॉम होम होतं तर कुणाचं वर्क फ्रॉम जेल होतं.
पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या करिश्म्याने सत्तांतर झालं आणि आपलं सरकार आलं.’

तसेच डॉ. रणजीत पाटील हे धडाकेबाज काम करणारे नेते आहेत. त्यांनी माझी खाती चांगल्या प्रकारे सांभाळली.
असे म्हणत त्यांनी डॉ. रणजीत पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

Web Title :- Navneet Rana | amravati mp navneet rana says chief minister of maharashtra in my mind is devendra fadnavis amravati graduate constituency election ranjeet patil campign rally

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadanvis | ‘मागचं सरकार फेसबुकवर लाईव्ह होतं अन् जनतेत मृत होतं’; देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाविकास’ सरकारवर हल्लाबोल

Ramdas Kadam | रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

Ajit Pawar | हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे, अजित पवार म्हणाले – ‘माझं स्पष्ट मत आहे, आत्ता जे घडत आहे त्याला…’