Navneet Rana | अमरावतीत ‘लव्‍ह जिहाद’च्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; खा. नवनीत राणांसह अनेक नेते सहभागी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – लव्ह जिहादच्या विरोधात अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी (दि. 19) धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासह अनेक नेते मोर्चात सहभागी झाले होते. दिल्लीत श्रद्धा वालकर या तरुणीचा निर्घूण खून करण्यात आला. त्यानंतर हा लव्ह जिहादचा मुद्दा पेटला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी लव्ह जिहाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच धर्मांतर बंदी कायद्याची देखील मागणी केली. सकल हिंदू समाजाच्या वतीने या मोर्चचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला आणि युवती सहभागी झाल्या होत्या. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी देखील या मोर्चाला हजेरी लावली. शहरातील राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana), आमदार प्रवीण पोटे, भाजपच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष निवेदिता चौधरी आणि विश्‍व हिंदू परिषद व दुर्गा वाहिनी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशातील सर्व राज्यांमध्ये लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा पारीत करावा, यासाठी मी लोकसभेत आवाज उठवणार असल्याचे राणा यांनी यावेळी सांगितले. तसेच कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांतून केली जाणारी हिंदू देव-देवतांची विटंबना, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य कदापिही सहन केले जाणार नाही, असा इशारा यावेळी राणांनी दिला.

देशभरात मागील काही काळात लव्ह जिहादच्या घटनांमंध्ये वाढ झाली होती.
त्यामुळे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
खोटे बोलून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे जबरदस्ती धर्मांतर केले जाते.
धर्मांतराला विरोध करणाऱ्या मुलींच्या हत्या होतात. हे प्रकार रोखले नाहीत,
तर देशात हिंदूंचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.
त्यामुळे शासनाने देशात लव्ह जिहादविरोधी कायदा आणि धर्मांतर बंदी कायदा आणावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

 

 

Web Title :- Navneet Rana | love jihad anti conversion march in amravati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा