Navneet Rana | खा. नवनीत राणांचा दावा साफ खोटा, पोलिसांनी न्यायालयात केलं सिद्ध! (व्हिडिओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर (Amravati Municipal Commissioner Praveen Ashtikar) यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केल्याचा दावा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला होता. परंतु वैद्यकीय तपासात (Medical Examination) पोलिसांनी कुणालाही मारहाण (Beating) केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलेला दावा हा पोलिसांनी न्यायालयात खोटा ठरवला आहे. या कर्यकर्त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

अमरावती (Amravati) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन पेटलेला वाद अजूनही शमायचे नाव घेत नाही. अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक प्रकरणात पाच जणांना अटक (Arrest) केली आहे. पोलीस कोठडीमध्ये युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना पोलीस जबर मारहाण करत असल्याची तक्रार सूरज मिश्रा, अजय बोबडे, महेश मुल चंडाणी, संदीप गुल्हाने या आरोपींनी थेट न्यायाधीशांकडे केली होती.

 

न्यायाधीशांनी त्या सगळ्यांची पाहणी केली व या आरोपींना पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) दाखल केले होते. मात्र, वैद्यकीय तपासणी दरम्यान जखमा नसल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकारी यांनी दिला. परंतु ही तपासणी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यामुळे त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाने चारही आरोपींना 15 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील एका आरोपीची प्रकृती खराब झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेतील मुख्य आरोपी रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह सहा जण अद्याप फरार आहेत.

 

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली, याबद्दल मावाधिकार आयोगाकडे (Human Rights Commission) तक्रार करणार, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. दिल्लीवरून शनिवारी परतल्यानंतर नवनीत राणा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) गेल्या असता पोलिसांनी त्यांची आणि आरोपींची भेट नाकारली.

 

पोलीस ठाण्यात हजर असलेल्या पोलीस उपायुक्त साळी (Deputy Commissioner of Police Sali)
यांची भेट घेण्यसाठी नवनीत राणा जात असताना त्यांच्या सचिवांना आतमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला.
त्यामुळे नवनीत राणा व राजापेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे (Police Inspector Manish Thackeray)
यांच्यात बाचाबाची झाली, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर व्हायरल होत आहे.

 

Web Title :-  Navneet Rana | navneet ranas claim proved to be false amravati police did not beat the party workers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या देहुगावात पत्नीनं साथीदारांच्या मदतीनं केली पतीची ‘गेम’, कारण जाणून बसेल धक्का

 

Pune Crime | अभ्यासासाठी मुलाला का मारते? पती रागावल्याने पत्नीने उचलले टोकाचं पाऊल

 

Torna Fort News | दुर्दैवी ! तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू