Navneet Rana | ‘मुख्यमंत्री पद सोडा आधी ‘हे’ पद महिलांना द्या’; खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Rana | गुजरात निवडणुकीबद्दल बोलताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एक मोठे विधान केले होते. राज्यात महिला मुख्यमंत्री करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. शिवसेना-महाविकास आघाडीकडून तसा प्रयत्न होत असेल, तर महाराष्ट्रातल्या महिलांचा तो सर्वोच्च बहुमान असेल, असे राऊत (Vinayak Raut) म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या विधानाचा आधार घेत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

“जंगल पूर्ण खाली झाल्यानंतर उद्धव ठाकरे एकटे डरकाळी फोडत आहेत. त्यांनी पहिल्यांदा एखाद्या महिलेला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, मग मुख्यमंत्रिपदाची चर्चा करू. आता मुख्यमंत्रीपद मिळणारी महिला कोण ती घरातीलच आहे, की घराच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का? कोणतीही महिला मुख्यमंत्री झाली तरी अभिमान वाटेल. पण ५० पैकी ४० गेले आणि उद्धव ठाकरे खोटी आश्वासने द्यायला लागले आहेत,” असा टोला त्यांनी (Navneet Rana) उद्धव ठाकरेंना लावला आहे.

 

नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या, “महाराष्ट्रात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री झालेली नाही.
जर एखादी महिला मुख्यमंत्री झाली तर ती अभिमानास्पद बाब आहे.
पण, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा अंबादास दानवेंकडील विरोधी पक्षनेतेपद एका महिलेला द्यावं.
त्यांना जर विरोधी पक्षनेतेपद देण्याइतका भरवसा महिलांवर नसेल तर उद्धव ठाकरे खोटी स्वप्नं दाखवत आहेत.
महिलांची शक्ती आता उद्धव ठाकरेंना दिसतेय. पहिले विरोधी पक्षनेतेपद महिलेला द्या,”
अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

 

Web Title :- Navneet Rana | navneet ranas target uddhav thackeray over women cm statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Virat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..

Nora Fatehi | अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा; सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव