Navneet Rana On Nitish Kumar | ‘उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीशकुमारांनीही भाजपाच्या पाठित खंजीर खूपसला’ -; खासदार नवनीत राणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Rana On Nitish Kumar | महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली आणि सत्ता मिळवली तर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला, असा सूर सर्वत्र असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नेहमीप्रमाणे भाजपाची बाजू मांडली आहे. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला त्याचप्रमाणे नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खूपसला, असे राणा यांनी म्हटले आहे. (Navneet Rana On Nitish Kumar)

 

खासदार नवनीत राणा यांनी म्हटले की, नितीश कुमार हे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे मोदींच्या नावावर मत मागून सत्तेत आले होते. कमी जागा असतानाही भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवले. कारण अमित शहा यांनी नितीश कुमार यांना शब्द दिला होता. मात्र, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला त्याचप्रमाणे नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. (Navneet Rana On Nitish Kumar)

 

मात्र, खासदार नवनीत राणा एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी बिहारविषयी पुढील भाकीत व्यक्त करत म्हटले की, महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत, भाजपासोबत सत्ता स्थापन केली, असाच प्रकार पुढे बिहारमध्येही पहायला मिळेल. बिहारची जनताच नितीश कुमार यांना धडा शिकवेल.

बिहारमध्ये भाजपाला सत्तेच्या बाहेर काढत जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
तर राजदचे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

9 वर्षांत नितीश कुमार यांनी दोन वेळा भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे.
2013 मध्ये भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पंतप्रधान पदाचे
उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर त्याला विरोध करत नितीश कुमार यांनी भाजपासोबत आघाडी मोडली होती.

 

2015 मध्ये विधानसभा निवडणुकीत लालूंच्या आरजेडीसोबत महाआघाडी करत नितीश कुमार यांनी भाजपाचा दारुण पराभव केला होता.
2017 मध्ये नितीश कुमार हे महाआघाडीची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत एनडीएमध्ये आले होते.
त्यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Assembly Elections) नितीश कुमार यांनी भाजपासोबत आघाडी करून विजय मिळवला होता.
आता नितीश कुमार यांनी पुन्हा आरजेडीसोबत जवळीक करत आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

 

Web Title :- Navneet Rana On Nitish Kumar | MP navneet rana criticized nitish kumar after resign as cm of bihar bihar politics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

 

RBI Action On Rupee Co-Operative Bank | रुपी बँकेचा RBI कडून परवाना रद्द

 

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू