Navneet Rana on Sanjay Raut | नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Rana on Sanjay Raut | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्याविरोधात नागपूर पोलिसांत (Nagpur Police) तक्रार दाखल केली आहे. तीन दिवसापूर्वी नागपूर दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी यापुढे मातोश्री समोर आंदोलन करायला आल्यास वीस फूट खड्ड्यात गाडले जाल असं वक्तव्य आणि चेतावणी दिली होती. यानंतर आता संजय राऊत यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Nagpur CP Amitesh Kumar) यांच्याकडे केली.

 

नागपूर येथील माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता राणा यांना जातीवाचक शिवीगाळ आणि जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले होते की, ”मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसून हनुमान चालीसा वाचणे, अशा प्रकारची भाषा, नुसती वापरली नाही तर जणू काही आम्ही महान योद्धे आहोत, सत्यवादी आहोत, अशा प्रकारचा आव आणून अमरावतीचे बंटी आणि बबली मुंबईत आले. कृपा करुन शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका, मातोश्रीशी छेडछाड करु नका, वीस फूट खाली गाडले जाल, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका,” असा इशारा राऊत यांनी दिला होता. तसेच, ”आम्ही अमरावतीत जाऊ, पाहू अमरावती कोणाचं आहे, यापुढे जर कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं, तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावं,” असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Navneet Rana on Sanjay Raut | Amravati MP navneet rana lodges complaint against sanjay raut in nagpur police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ ! मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणे महागात पडणार?

 

Dryness In Mouth And Throat At Night | सकाळी झोपेतून उठतानाच तोंडाला-घशाला खूप कोरड पडतेय?; ‘हे’ पाहा 5 कारणे, काळजी घ्या !

 

Shivsena Leader Deepali Sayed | ‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरीही ती फोडली असती, हे बाळासाहेबांचे शिवसैनिक’