Navneet Rana-Ravi Rana | राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Rana-Ravi Rana | मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अमरावतीच्या खासदार (Amravati MP) नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना कलम 153 (अ) म्हणजेच चिथावणीखोर वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण होईल, असं कृत्य केल्याच्या आरोपाखाली अटक (Arrested) केली. आज राणा दाम्पत्याच्या अर्जावर सत्र न्यायालयात (District Sessions Court) सुनावणी पार पडली. या सुनावणीत राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याने तोवर त्यांना तुरूंगातच राहावे लाहणार आहे. (Navneet Rana-Ravi Rana)

 

सत्र न्यायालयाने सांगितले की, राणा दाम्पत्याच्या जामिनाच्या याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिले आहेत. त्यानंतरच सुनावणीची तारीख ठरवू असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता 29 एप्रिल रोजी जामीनाच्या अर्जावर सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Navneet Rana-Ravi Rana)

 

दरम्यान, अटकेसाठी गेलेल्या पोलिसांसोबत राणा दाम्पत्यांनी हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात कलम 353 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला गेला आहे. याची नोंद दुस-या एफआयआरमध्ये केली आहे.

 

Web Title :- Navneet Rana-Ravi Rana | amravati mp navneet kaur rana and ravi rana no relief from mumbai sessions court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा